नंदुरबार - सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलमध्ये राज्यस्तरीय अश्व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण राज्यातून या स्पर्धेसाठी ६० स्पर्धकांची अंतिम चाचणी निवड करण्यात आली होती. या निवडक रांगोळीचे फेस्टिवलमध्ये प्रदर्शन मांडण्यात आले आहे.
सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलमध्ये दरवर्षी अश्व सौंदर्य स्पर्धा, अश्व दौड यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यातलाच एक भाग म्हणून चेतक फेस्टिवलमध्ये अश्व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील ६० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये राज्यस्तरीय फ्लोरबॉल स्पर्धेचे आयोजन; विजयी संघ करणार राज्याचे प्रतिनिधीत्व
या रांगोळीचे प्रदर्शन चेतक फेस्टिवलमध्ये मांडण्यात आले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात अश्वप्रेमी हजेरी लावत आहेत. रांगोळीच्या माध्यमातून प्रतिबिंब रेखाटण्यात आल्याने हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. एकूणच सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये घेण्यात आलेली राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा हा एक आनोखा प्रयोग म्हटला जाईल. रांगोळी स्पर्धेतील पहिल्या विजेत्याला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस चेतक फेस्टिवलच्या वतीने देण्यात आले. तर, न द्वितीय बक्षीस ३१ हजार आणि तृतीय बक्षीस २१ हजार रुपयांचे देण्यात आले आहे.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये बसची दुचाकीला धडक; 1 ठार