ETV Bharat / state

Rajvadi Kathi Holi Special : सातपुड्याच्या कुशीत रंगली राजवाडी होळी; लाखो समाज बांधवांनी घेतला सहभाग

कोरोनाचा दोन वर्षांनंतर सातपुड्यातील राजवाडी काठी होळी यंदा मोठा उत्साहात साजरा ( Rajwadi Kathi Holi celebrate ) करण्यात आली. आदिवासी संस्कृतीमध्ये होळीच्या सणाला अधिक महत्व आहे. आजपासून आठ दिवस सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये घुंगरू आणि ढोलचा आवाज घुमणार ( nandurbar holi festival ) आहे. दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने साध्या पद्धतीने तोंडाला मास्क लावून पारंपारीक नृत्य करीत मोजक्या आदिवासी बांधवानी होळीचा साजरी केली.

Rajwadi Kathi Holi celebrate in of satpuda area
सातपुड्याच्या कुशीत रंगली राजवाडी होळी
author img

By

Published : Mar 18, 2022, 12:06 PM IST

Updated : Mar 18, 2022, 12:37 PM IST

नंदुरबार - आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला होळीचा सण सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात ( nandurbar holi festival ) पार पडला. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या पर्वतरंगांमध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी ही मोठ्या थाटात ( Rajwadi Kathi Holi celebrate ) संपन्न झाली. या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये आता येणाऱ्या पाच दिवस होळीची धूम पाहायला मिळेल.

सातपुड्याच्या कुशीत रंगली राजवाडी होळी

दोन वर्षांनंतर राजवाडी काठी होळी उत्साहात साजरी -

कोरोनाचा दोन वर्षांनंतर सातपुड्यातील राजवाडी काठी होळी यंदा मोठा उत्साहात साजरा करण्यात आली. आदिवासी संस्कृतीमध्ये होळीच्या सणाला अधिक महत्व आहे. आजपासून आठ दिवस सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये घुंगरू आणि ढोलचा आवाज घुमणार आहे. दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने साध्या पद्धतीने तोंडाला मास्क लावून पारंपारीक नृत्य करीत मोजक्या आदिवासी बांधवानी होळीचा साजरी केली. यंदा कोरोनाचे संकट काही प्रमाणात सावरल्याने हजारोंचा संख्येत महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथील आदिवासी काठी राजवाडी होलीकात्सवात सामील झाले. ढोल, बासरी, घुंगरू व शिट्यांचा सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपारिक पेहराव येथे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत असतो.

Rajwadi Kathi Holi celebrate in of satpuda area
सातपुड्याच्या कुशीत रंगली राजवाडी होळी

आदिवासी समाजात होळीला मोठे महत्त्व -

काठीच्या होळीला आदिवासी समाजात मोठे स्थान आहे. या होळीला राजवाडी होळी असे संबोधले जाते. सातपुड्यात वसलेले व ऐतिहासिक वारसा लाभलेले काठी संस्थान आजही राजवडी होळीसाठी प्रसिद्ध आहे. सातपुड्यातील आदिवासींचे कुलदैवत राजाफांटा, गांडा ठाकूर यांनी होलिकोत्सवास प्रारंभ केला. त्यानंतर काठी संस्थानचे बाराव्या शतकातील राजे उमेदसिंह यांच्या कारकीर्दीपासून 1247 पासूनची ऐतिहासिक परंपरा आजही टिकून आहे. आजही हा पारंपरिक उत्सव मोठ्या जल्लोशात साजरा केला जातो. या काळात ढोलाचा आवाज सातपुड्याच्या कानाकोपऱ्यात निनादतो. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सात दिवस ब्रह्मचर्याचे पालन करण्यात येते. तसेच शस्त्रपूजन करुण आपले शक्ती प्रदर्शन देखील करता येते.

होळी उत्सवासाठी घेतली जातात अनेक रूप -

होळीच्या या उत्सवात आपआपल्या कला पथकांसह सामील होण्यासाठी सातपुड्यात पंधरा दिवस आधीपासून आदिवासी बांधवांनी तयारी केली होती. घुंगरू, मोरपिसांचा टोप, ढोलकी, मोठा ढोल, बासरी, शस्त्र असा साज परिधान करून आणि अंगावर विविध रंगाची नक्षीकाम करून होलिकोत्सवात सामील होतात. आदिवासी बांधव येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत असतात.

शेकडो वर्षांची परंपरा असलेली होळी -

आदिवासी समाज जीवनात अतिशय महत्वाचे स्थान असलेल्या राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरु केल्याच म्हटले जात. १२४६ पासून सुरु झालेला हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि सामानातेतील वैविध्याचे रंग आणि पारंपारिक स्वरूप कायम ठेवून आहे. सातपुड्यातील डोंगर रागांमधील काठीची राजवाडी होळीचा मोठ्या उत्साहात असतो. आदिवासी बांधव हि होळी पारंपारिक साजात साजरी केली. ढोल, बासरी, शिट्यांचा सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपारिक पेहराव येथे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होते. स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपारिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधव पाहटे सूर्योदयाच्या पूर्वी ही होळी पेटवली आणि वर्षभराच्या कष्टाचे बळ सोबत घेऊन गेले.

रात्रभर रंगतोय उत्सवाचा रंग -

संपूर्ण रात्रभर बेधुंद होऊन नाचणारे आदिवासी बांधव आणि त्यांच्यातली ऊर्जा पाहिल्यावर येथे येणारा प्रत्येक जण भारावून जातो. सामाजिक एकोपा आणि एकमेकांप्रती असलेला आदर भाव हा या समाजाला अजूनही एकत्र ठेवून आहे, त्याचे प्रमुख कारण ठरले आहे. होलिकोत्सव हा आदिवासी जीवनातला सर्वात महत्वाचा सण. होळी साजरी करताना आदिवासी संकृतीत पुरुष महिला असा भेदाभेद नाही. गरीब - श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते. सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये राजावाडी होळी म्हणून लौकिक असलेल्या “काठी” संस्थांची होळी सालाबादाप्रमाणे मोठ्या धूम धडाक्यात साजरी होते. कुणालाही आमंत्रण दिल जात नाही कि कुणाला मानसन्मान दिला जात नाही तरी या काठीच्या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव सामील झाले होते.

हेही वाचा - Incidents in Virar : होळीचा उत्साह जीवावर बेतला; बाईकस्वारावर फुगा मारल्याने एकाचा मृत्यू

Last Updated : Mar 18, 2022, 12:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.