नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. काल दिवसभर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यासोबत वारा देखील मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्याने काही काळ विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. नदीकाठ परिसरातील रहिवाशांना निसर्ग चक्रीवादळाच्या भीतीचे वातावरण होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून नदीकाठावरील नागरिकांचे स्थलांतरित करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.
संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाच्या बारीक सरी होत्या. मात्र, काही वेळातच बारीक सरींची मोठ्या पावसात रुपांतर झाले. सुमारे तीन ते चार तास पाऊस बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निसर्ग चक्रीवादळाच्या खबरदारीसाठी विद्युत प्रवाह दिवसभर बंद ठेवला होता. जिल्ह्यात दिवसभर पाऊस परतल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते तर नदीकाठ परिसरातील रहिवाशांना निसर्ग चक्रीवादळाच्या भीतीचे वातावरण होते.