नंदुरबार - दोन राज्यांच्या मध्यवर्ती असलेल्या नंदुरबार रेल्वे स्थानकावर साफ सफाई करणाऱ्या सफाई कामगारांचा रेल्वे प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला. कोरोना विरुद्धच्या लढाईत सफाई कामगारांची महत्त्वाची भूमिका आहे. या सफाई कामगारांचा सत्कार करून त्यांना सुरक्षा किट आणि अन्नधान्याचे पॉकेट रेल्वे कर्मचार्यांकडून देण्यात आले. रेल्वे प्रशासनाने याप्रकारे सफाई कामगारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कोरोना रोगाच्या प्रादुर्भावमुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने रेल्वे वाहतूक बंद केली असली तरी देखील नंदुरबार स्टेशनवर रोजंदारी कर्मचारी रोज नित्यनियमाने साफ सफाई करतात. बंद काळात देखील येथील कर्मचारी रेल्वे स्टेशनची निगा आपल्या घराप्रमाणे ठेवलीय.
सफाई कामगारांच्या कामाची दखल घेत नंदुरबार रेल्वे प्रबंधक यांच्यातर्फे कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्टेशन प्रबंधक वसंतलाल मंडल, परिवहन निरीक्षक सुभाषचंद्र झा, रेल्वे गार्ड एस. ऐन. तायडे, सफाई कर्मचारी सुपरवायझर रामभैय्या कडोसे व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.