ETV Bharat / state

नंदुरबारात बियरबारवर धाड; ३ लाखाचा मुद्देमाल जप्त - नंदुरबारात बियरबारवर धाड

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने दारू विक्रीला बंदी आहे. परंतू संचारबंदीचा फायदा घेत जादा दराने चोरट्या मार्गाने दारूची विक्री सुरू होती. नंदुरबार येथील कोरीट रस्त्यालगत असलेल्या हॉटेल गजराजच्या पाठीमागे असलेल्या दरवाजाने एलसीबीच्या पथकाने धाड टाकली.

Raid on Bearbar in Nandurbar District
नंदुरबारात बियरबारवर धाड; ३ लाखाचा मुद्देमाल जप्त
author img

By

Published : Apr 28, 2020, 10:04 AM IST

नंदुरबार - शहरातील कोरीट रोडवरील हॉटेल गजराजमध्ये संचारबंदी लागू असल्याचा फायदा घेवून देशी-विदेशी दारूची जास्त दरात चोरटी विक्री सुरू असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाड टाकली. यात ३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने दारू विक्रीला बंदी आहे. परंतू संचारबंदीचा फायदा घेत जादा दराने चोरट्या मार्गाने दारुची विक्री सुरू होती. नंदुरबार येथील कोरीट रस्त्यालगत असलेल्या हॉटेल गजराजच्या पाठीमागे असलेल्या दरवाजाने एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत दारू पीत असलेले २ ते ३ जण हॉटेलच्या मोकळ्या जागेतुन पळून गेले. तसेच हॉटेलच्या काऊंटरवर उभ्या असलेल्या एका जणाला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव मनोज हिरालाल चौधरी असे आहे. तो नंदुरबार येथील जयचंदमधील रहिवाशी आहे.

Raid on Bearbar in Nandurbar District
नंदुरबारात बियरबारवर धाड; ३ लाखाचा मुद्देमाल जप्त
Raid on Bearbar in Nandurbar District
नंदुरबारात बियरबारवर धाड; ३ लाखाचा मुद्देमाल जप्त

पथकाने त्याच्याकडून ८० हजार ६८५ रुपयांची किंगफिशर बियरच्या ४८९ काचेच्या बाटल्या, १२ हजार ३७५ रुपयांची स्मिर्न ऑफ व्होडकाच्या ३३ काचेच्या बाटल्या, २२ हजार ८०० रुपयाच्या फोर्ट वाईनच्या १२० बाटल्या, २४ हजार ९९० रुपये किमतीच्या किंगफिशर बियरचे २५५ टिन, ३३ हजार ८७५ रुपये किमतीचे किंगफिशर बियरचे २७१ टिन, १७ हजार ३२५ रुपये किमतीचे टुबर्ग बियरचे १०५ टिन, २० हजार ३८४ रुपये किमतीचे टुबर्ग बियरचे २०८ टिन, ११ हजार २७० रुपये किमतीचे बडवायझर बियरचे ४९ काचेच्या मोठ्या बाटल्या, ७८ हजार ६०१ रुपये किमतीची बियर आणि देशी विदेशी दारु असा एकुण ३ लाख २ हजार ३०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिलीप हिरालाल चौधरी (वय- ४७ रा. जयचद नगर, नंदुरबार) हा लॉकडाऊन दरम्यान देशी-वदेशी दारूची चोरटी विक्री करताना आढळून आला. तसेच हॉटेल मालक दिलीप हिरालाल चौधरी या दोघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दारूबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायदासह साथीचे रोग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.