नंदुरबार- येथील राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची जनसुनावणी संपन्न झाली आहे. आई-वडील नसलेल्या मुलांच्या तक्रारी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि जिल्हाधिकारी, अधिकारी यांच्या बैठकीत जनसुनावणी घेण्यात आली. या बैठकीत धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यातून एकूण 99 तक्रारी होत्या. त्यापैकी 76 तक्रारीवर तत्काळ निर्णय देण्यात आले. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असल्याने याठिकाणी मुलांच्या शिक्षण आरोग्य या बाबींवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी दिली.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची जनसुनावणी संपन्न;76 तक्रारीवर तत्काळ निर्णय - नंदुरबार
आई-वडील नसलेल्या मुलांच्या तक्रारी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि जिल्हाधिकारी,अधिकारी यांच्या बैठकीत जनसुनावणी घेण्यात आली.
नंदुरबार- येथील राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची जनसुनावणी संपन्न झाली आहे. आई-वडील नसलेल्या मुलांच्या तक्रारी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि जिल्हाधिकारी, अधिकारी यांच्या बैठकीत जनसुनावणी घेण्यात आली. या बैठकीत धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यातून एकूण 99 तक्रारी होत्या. त्यापैकी 76 तक्रारीवर तत्काळ निर्णय देण्यात आले. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असल्याने याठिकाणी मुलांच्या शिक्षण आरोग्य या बाबींवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाद्वारे यापुढेही आई-वडील नसलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षण आरोग्य घेण्यासाठी आश्रम शाळांमध्ये दाखल करून त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
Conclusion:समाजातील वंचित व आई-वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना नागरिकांनी बाल हक्क संरक्षण आयोग पर्यंत त्यांची तक्रार नोंदवावी, पीडित विद्यार्थ्यांची तक्रार प्रशासनापर्यंत कोणताही व्यक्ती करू शकतो तसेच प्रसारमाध्यमांनीही पीडित विद्यार्थ्यांची दखल घेऊन प्रशासनाला कळवावे अशी माहिती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य डॉक्टर आर जी आनंद यांनी दिली.