नंदुरबार - जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह आलेला हा पाऊस काहीसा दिलासा देऊन गेला. जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहत होते.
विजांच्या कडकडासह पडलेला हा पाऊस वीज वितरण विभागाची पोलखोल करून गेला. वादळी वारा सुरू होण्याआधीच वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला होता. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक छोट्या-मोठ्या गावामधला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. पावसाची ही चाहुल शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारे ठरली आहे.