ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी प्रहारचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात - prahar sanghatna Nandurbar news

निवेदनात संघटनेच्यावतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्यात ओला दुष्काळ जाहीर करणे, पंचनाम्याचा खेळ न करता सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये मदत देणे, गेल्या वर्षीचे पीक विम्याचे पैसे त्वरित मिळावे यासह विविध मागण्यांसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांना अटक करताना पोलीस
author img

By

Published : Nov 18, 2019, 8:39 PM IST

नंदुरबार- जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी. त्याचबरोबर, शासनाने पंचनाम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सुरू केलेली फसवणूक थांबवावी, अशा मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्यावतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

मागण्याबाबत सांगताना प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील

प्रहार संघटनेच्यावतीने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना ४ नोव्हेंबरला निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनात संघटनेच्यावतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्यात ओला दुष्काळ जाहीर करणे, पंचनाम्याचा खेळ न करता सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये मदत देणे, विद्युत पंपासाठी रात्री दिला जाणारा विद्युत पुरवठा दिवसा देणे, गेल्या वर्षीचे पीक विम्याचे पैसे त्वरित मिळणे, यासह विविध मागण्यांसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठिय्या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेने दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करताना पोलिसांनी त्यांना अडविले. पोलिसांनी आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक तीव्र भूमिकेत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा- बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाची दुरवस्था; दुरुस्त न झाल्यास महामार्ग बंदचा इशारा

Intro:नंदुरबार - जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी शासनाने पंचनाम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सुरू केलेली फसवणूक थांबवावी आदी मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर ताबा मिळवू असा देखील इशारा देण्यात आला होता. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अटक करण्यात आली.Body:प्रहार संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना दिनांक 4 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आली होती. त्या निवेदनात संघटनेच्यावतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या त्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, पंचनाम्याच्या खेळ न करता सरसकट हेक्‍टरी पंचवीस हजार रुपये मदत द्यावी, विद्युत पंपासाठी रात्री दिला जाणारा विद्युत पुरवठा दिवसा करण्यात यावा, गेल्या वर्षाचे पीक विम्याचे पैसे त्वरित मिळावे यासह सह विविध मागण्यांसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन मांडले होते.
शासनाने प्रहार संघटनेच्या या ठिय्या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेण्याचा इशारा प्रहार संघटने दिला होता. अखेर आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयात घुसत असताना त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रमुख द्वाराजवळ थांबविण्यात आले. पोलिसांनी समजण्याचा प्रयत्न केला असता आंदोलन तीव्र भूमिकेत असल्याचे पाहून शेवटी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

Byte - बीपीन पाटील
प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष, नंदुरबारConclusion:Byte - बीपीन पाटील
प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष, नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.