नंदुरबार - थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी विज वितरण कंपनी कठोर पावले उचलत आहे. याअंर्गतच शहादा विभागातील धडगाव उपविभागात 3 हजारांच्या वर ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. यामुळे, धडगाव शहरासह दुर्गम भागातील अनेक घरे गेल्या आठ दिवसांपासून अंधारात आहेत.
धडगाव उपविभागातील घरगुती आणि व्यावसायिक वीज बिलांची वसुली गत सहा महिन्यांपासून झालेली नसल्याची माहिती आहे. विज वितरण कंपनीकडून थकबाकीदार ग्राहकांना वारंवार सूचना करुनही त्यांच्याकडून वीज बिलांचा भरणा झाला नाही. अखेर गेल्या आठवड्यापासून वीज कनेक्शन कापण्याची कारवाई सुरु करण्यात आली होती. याअंतर्गत आतापर्यंत 3 हजार 400 ग्राहकांचे वीज कनेक्शन कापले गेले आहे.