नंदुरबार - जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव तालुक्यातील मोदलगाव येथे मजुरांना घेवुन जात असलेली पीकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटुन अपघात ( Tragic Accident in Nandurbar ) झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यु ( Three died in pickup accident in Nandurbar ) झाला असून नऊ जण जखमी झाले आहे. मयतांमध्ये दोन लहान बालकांचा आणि एका महिलेचा समावेश आहे. तर एका जखमीची प्रकृती चिंताजणक आहे. घटनास्थळी जळगाव पोलीस दाखल झाली असून जखमींना तळगाव रुग्णालयात दाखल करण्याची काम सुरू आहे.
पिकअपवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात -
धडगाव तालुक्यातील मोदलगाव येथे मजुरांना घेवुन जात असलेली पीकअपचा उत्तार भागावर नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या पीकअपमध्ये जवळपास २५ हून अधिक मजुर होते. हे सर्व जण मजुरीसाठी बाहेरगावी जात होते. गावाजवळच्या घाटातील तीव्र उतारावर चालकांचे गाडीवरील नियंत्रन सुटल्याने ती उलट दिशेने जात नजीकच्या दरीत कोसळली ( Pickup collapses valley in Nandurbar ). दरम्यान घटनेनंतर पोलीस प्रशासनासह परिसरातील नागरिकांनी घटनस्थळी धाव घेवुन मदतकार्य केले. जखमींना रुग्णवाहीका आणि खाजगी वाहनातून धडगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नंदुरबारमध्ये पीकअप अपघातात तिघांचा जागीच मृत्यू -
जळगाव तालुक्यातील अति उतार असलेल्या भागावर पिकअपवरील चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप ते दीडशे फूट दरीत कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला यात दोन लहान बालके तर एका महिलेच्या समावेश आहे. या अपघातात नऊ जण जखमी झाले आहेत जखमींना धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.