नंदूरबार - अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. राज्यातील भौगोलिक दृष्ट्या प्रतिकूल असलेल्या या भागात अजूनही रस्ते, वीज, आरोग्याच्या सुविधा अनेक गावांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत.
हेही वाचा - 'वंचित' पासून दूर होणं 'एमआयएम'च्या पथ्थ्यावर पडणार?
या मतदारसंघात आतापर्यंत बहुरंगी लढती झाल्या आहेत. त्याचा फायदा विद्यमान आमदार के. सी. पाडवी यांना झाला आहे. ते या मतदारसंघाचे गेल्या ३० वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहे. आमदार पाडवी यांनी तीस वर्षात या मतदारसंघातील अनेक विकासकामे प्रतिकूल परिस्थितीत मार्गे लावलेत. पाडवींचा मोठा जनसंपर्क आणि मितभाषी वकृत्व, त्यांच्यासोबत मतदारसंघावर असलेली पकड ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
हेही वाचा - काँग्रेसचा मास्टरप्लान ! त्यामुळे पक्ष राज्यात पुन्हा मारणार मुसंडी?
राष्ट्रवादीचे नेते किरसिंग वसावे आणि विजय पराडके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर, भाजपचे माजी जिल्हाअध्य्क्ष नागेश पाडवी, डॉ. नरेंद्र पाडवी, आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी या मतदारसंघातून प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत. त्याचसोबत डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या डॉ. सुप्रिया गावित यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा सांगितला आहे. तसेच काही अपक्ष उमेदवार यावेळी उभे राहू शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणत मतविभाजनाची शक्यता आहे.. त्याचा फायदा नेहमीप्रमाणे विद्यमान आमदारांना होऊ शकतो. मात्र, या मतदारसंघात आघाडीपेक्षा युतीला सर्वात मोठा बंडखोरीचा फटका बसू शकतो. कारण हा मतदारसंघ युतीच्या २००९ च्या जागा वाटपात सेनेच्या वाट्याला गेला आहे. मात्र, भाजपच्या इच्छुकांनी या ठिकाणी तयारी सुरू केल्याने बंडखोरी निश्चित मानली जात आहे.
या मतदारसंघात धनगर आरक्षण, आदिवासी विकास विभागाने शिक्षण क्षेत्रात सुरू केलेल्या डीबीटीचा मुद्दा प्रमुख असेल. तसेच अनेक स्थानिक मुद्दे निवडणुकीत महत्वाचे असतील. या मतदारसंघात जितके जास्त उमेदवार असतील तितकाच फायदा काँग्रेसचे उमेदवार आमदार के. सी. पाडवी यांना होईल.