ETV Bharat / state

ठाणेपाडा जंगलात मांडूळाची तस्करी; एकाला अटक - नंदुरबार क्राईम न्यूज

नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गावाजवळ मांडूळाची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. मांडूळाची तस्करी करत असताना वग्रलाल गवळी चव्हाण (रा.जामदे ता.साक्री) याला ताब्यात घेण्यात आले.

Indian sand boa
मांडूळ
author img

By

Published : Aug 29, 2020, 12:12 PM IST

नंदुरबार - ठाणेपाडा परिसरात मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन मोटारसायकल, डिजिटल वजन काटा व दोन लाख रूपये किंमतीचे जिवंत मांडूळ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नंदुरबार वनविभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

ठाणेपाडा जंगलात मांडूळाची तस्करी

नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गावाजवळ मांडूळाची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. मांडूळाची तस्करी करत असताना वग्रलाल गवळी चव्हाण (रा.जामदे ता.साक्री) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून तीन मोटारसायकल, एक डिजिटल वजन काटा व मांडूळ जप्त करण्यात आले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मांडूळला नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नंदुरबारचे वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी, नवापूरचे प्रथमेश हाडपे, चिंचपाड्याचे आर.बी.पवार, प्रशांत हुमने, एस. एम. पाटील, पी. डी. पवार, अभिजित पाटील, अरविंद निकम, भुपेश तांबोळी, कल्पेश अहिरे, भानुदास वाघ, एस. पी. पदमोर, लक्ष्मण पवार, दीपक पाटील, प्रतिभा बोरसे, रेखा गिरासे, ममता पाटील, नयना हडस, माजी सैनिक विशाल शिरसाठ यांनी ही कारवाई केली. आरोपीविरोधात वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक व विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.