ETV Bharat / state

'तो' खून एकतर्फी प्रेमातून; आरोपीला अटक - Nandurbar Crime Branch News

नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील भटुलाल काशिनाथ परदेशी यांचा दोन दिवसांपूर्वी श्रावणी येथील शेतात खून झाला होता. अज्ञात कारणातून हा खून झाल्याचा गुन्हा विसरवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. मात्र, तपासाअंती हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे.

Arrested criminal
अटक केलेल्या आरोपीसह तपास पथक
author img

By

Published : Feb 27, 2020, 11:57 AM IST

नंदुरबार - तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाला तिच्या विवाहाची कुणकुण लागली. तरुणाने मुलीच्या गावी येवून तिच्या वडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांना हे प्रेमप्रकरण मान्य नसल्याने त्यांनी तरुणाला शिवीगाळ केली. यामुळे दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत संतापलेल्या तरुणाने मुलीच्या वडिलांच्या डोक्यावर दगड मारुन खून केला. ही घटना नवापूर तालुक्यातील श्रावणी येथे घडली. नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 24 तासातच तपासाची चक्रे फिरवून आरोपीला अटक केली.

नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील भटुलाल काशिनाथ परदेशी यांचा दोन दिवसांपूर्वी श्रावणी येथील शेतात खून झाला होता. अज्ञात कारणातून हा खून झाल्याचा गुन्हा विसरवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांचा बारकाईने अभ्यास केला.

दरम्यान, मृत भटुलाल परदेशी यांची मुलगी नाशिक येथील कंपनीत कामाला असून तिचा एक सहकारी अधुनमधून घरी येवुन मुक्कामी राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नवले यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी एक पथक नाशिकला तपासासाठी रवाना केले. या पथकाने नाशिक येथे ऑनलाईन खरेदी-विक्री कंपनीत काम करणाऱ्या देवदत्त उदयवीरसिंग (रा.नरहरीनगर नाशिक, मुळगाव कादरवाडी, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याची नंदुरबार येथे आणून चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली.

हेही वाचा - बाळाला विष पाजून आईचा आत्महत्येचा प्रयत्न, घटनेला आता धक्कादायक वळण..!

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, विसरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, हेड कॉन्टेबल महेंद्र नगराळे, प्रमोद सोनवणे, पुष्पलता जाधव, जितेंद्र तोरवणे, विजय ढिवरे, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.