नंदुरबार - नंदुरबारात नक्षत्र छंद मंडळातर्फे शून्य सावलीचा अनुभव विद्यार्थी व भूगोलप्रेमींनी घेतला आहे. दुपारी 12 वाजून 32 मिनिटांनी नक्षत्र मंडळाच्या चेतना पाटील यांनी हा प्रयोग यशस्वीरित्या करून दाखविला आहे.
काय आहे शून्य सावलीचा प्रयोग?
नंदुरबारमध्ये दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांनी सूर्य डोक्यावर आल्यानंतर आपली सावली ही थेट पायाखाली पडत असल्याचे चित्र आजच्या दिवशी दिसून आले. यालाच भौगोलिक भाषेनुसार 'नो शॅडो डे' असे म्हटले जाते. या दिवसाची अनुभूती विद्यार्थ्यांना देवून या दिवसाचे महत्त्व विषारद करण्यासाठी काही हौशी शिक्षक आणि नंदुरबारमधील नक्षत्र छंद मंडळाने विद्यार्थ्यांसाठी ही संकल्पना स्पष्ट केली. शाळा बंद असतांना ज्या विद्यार्थ्यांना या भौगोलिक घटनेबाबत कुतूहल होते. त्यासाठी एका भूगोल शिक्षिकेने आपल्या छतावर वैज्ञानिक पद्धतीने प्रयोग मांडणी करून विद्यार्थ्यांना शून्य सावली दिनाची अनुभूती घडवून देण्यात आली.
भूगोल प्रेमी व विद्यार्थ्यांची उपस्थिती
नक्षत्र छंद मंडळातर्फे गेल्या दोन-तीन दिवसांपासून या प्रयोगाबाबत भूगोलप्रेमींना व विद्यार्थ्यांना माहिती दिली जात होती. त्याअनुषंगाने दुपारी बारापासूनच भूगोल प्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते. 12 वाजून 32 मिनिटांनी या प्रयोगाचा अनुभव विद्यार्थी व भूगोल प्रेमींनी घेतला.
हेही वाचा-यंदाचा आषाढी पालखी सोहळा पंढरपूरला पायी जाणार; वारकरी आणि महाराज मंडळींची भूमिका