नंदुरबार - जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यू, सिकलसेल आणि अॅनिमियाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने 'राष्ट्रीय पोषण अभियान जनजागृती सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले.
नंदुरबारसारख्या आदिवासी दुर्गम भागात मिळणाऱ्या रानभाज्या आणि इतर पदार्थांच्या मदतीने कुपोषणावर मात करता येईल. यासंदर्भात जागृती करण्यासाठी नंदुरबार शहरातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी रॅली काढली.
हेही वाचा - सरकारने सादर केलेल्या सिंचन घोटाळा प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचं नाव नाही
क्रीडा संकुलाच्या मैदानातून या रॅलीला सुरुवात झाली. नंदुरबारच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून पोषण जनजागृती अभियानाची सुरुवात केली. यावेळी महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.