ETV Bharat / state

Nandurbar Panchayat Samiti: नवापूर, अक्कलकुवा व तळोदा पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात, नंदुरबार व अक्राणीवर शिंदे गटाचा झेंडा - तळोदा पंचायत समिती

नंदुरबार जिल्ह्यातील सहा पंचायत समिती (Nandurbar panchayat samiti) सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ संपल्याने नविन सभापतींची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस, भाजपा व शिंदे गटात या तिघांतही अत्यंत चुरशीची लढत झाली.(Nandurbar panchayat samiti election).

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी
author img

By

Published : Oct 14, 2022, 11:08 AM IST

नंदुरबार: जिल्ह्यातील सहा पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन सभापतींची निवड करण्यात आली आहे. (Nandurbar panchayat samiti). काँग्रेस, भाजपा व शिंदे गटात या तिघांतही अत्यंत चुरशीची लढत झाली. (Nandurbar panchayat samiti election). यात नवापूर, अक्कलकुवा पंचायत समिती सभापती व उपसभापती काँग्रेस पक्षाचे, तळोदा पंचायत समिती सभापती काँग्रेसच्या तर उपसभापती भाजपचे झाल्या आहेत. त्याचप्रमाणे अत्यंत चुरशीची झालेली नंदुरबार पंचायत समिती व अक्राणी पंचायत समिती सभापती उपसभापती पदावर शिंदे गटाने आपला भगवा फडकावला. शहाद्यात काँग्रेसचे पुरेसे संख्याबळ असूनही सभेत सदस्य अनुपस्थित राहिल्याने पंचायत समितीत सभापती व उपसभापतीपदी भाजपाच्या उमेदवारांची संख्याबळ नुसार निवड झाली.

निवडणुकी निकालानंतर शिंदे गटातील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, की नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच वर्चस्व दिसून आले. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. संपत्तीच्या बळावर काही लोकांनी या निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र माझ्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्यांचे हे सर्व पर्यत्न हाणून पाडले.

नंदुरबार पंचायत समिती वर काँग्रेसच्या सहकार्याने शिंदे गट विजयी: नंदुरबार पंचायत समितीच्या सभापतीपदी शिंदे गटाच्या दुधाळे येथील सदस्या माया ताराचंद माळसे तर उपसभापतीपदी शीतल धर्मेंद्र परदेशी यांची निवड झाली. शिंदे गटाच्या या निवडीला कॉंग्रेसचे सहकार्य मिळाले. नंदुरबार पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी स्व. हेमलता गावीत सभागृतात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपातर्फे सभापती पदासाठी मालतीबाई गावीत यांनी अर्ज दाखल केला तर उपसभापती पदासाठी करण भिल यांनी अर्ज दाखल केला. शिंदे गटातुन सभापतीपदासाठी माया माळसे यांनी अर्ज दाखल केला तर उपसभापती पदासाठी शीतल परदेशी यांनी अर्ज दाखल केला. शिंदे गटाच्या सभापती व उपसभापती पदाच्या उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले होते. यावेळी हात उंचावुन मतदान घेण्यात आले. यावेळी शिंदे गटाच्या माया माळसे व शीतल परदेशी यांना ११ तर भाजपाच्या उमेदवार मालतीबाई गावीत व करण भिल यांना प्रत्येकी ८ मते मिळाली. भाजपाच्या एक सदस्या मतदानाच्या वेळेस अनुपस्थित होत्या.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

२० सदस्य संख्या असलेल्या नंदुरबार पंचायत समितीमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक अर्थात ११ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला ५, कॉंग्रेसला ३ तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. दरम्यान ओबीसी आरक्षणामुळे पोटनिवडणुकीत गुजरभवाली, पातोंडा, होळतर्फे हवेली, नांदर्खे गण, गुजरजांभोली या गणांमध्ये निवडणूक झाली. पाच रिक्त जागांसाठी झालेल्या या पोटनिवडणुकीत ४ जागांवर शिवसेनेने विजय मिळविला होता, तर भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. सद्यस्थितीत पंचायत समितीत भाजपाचे ९, शिवसेना शिंदे गटाचे ८ तर कॉंग्रेसचे ३ सदस्य आहेत.

धडगाव पंचायत समितीवर शिंदे गटाचे वर्चस्व: धडगाव पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाने आपले वर्चस्व राखले आहे. सभापतीपदी हिराबाई रवींद्र पराडके तर उपासभापती पदी भाईदास अत्रे यांची बिनविरोध फेरनिवड झाली. निवडणूक प्रक्रियेत सभापती पदासाठी हिराबाई पराडके व उपसभापती पदासाठी भाईदास अत्रे यांनी प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल केला होता. विशेष सभेत निवड प्रक्रियेत 15 पैकी 9 सदस्यांची मते मिळाल्याने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूकीचा निकाल जाहीर होताच शिवसेनिकांनी फटाक्याची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला.

नवापूर पंचायत समितीवर काँग्रेसचे सभापती: नवापूर पंचायत समितीच्या सभापती पदी बबीता गावीत व उपसभापती पदी शिवाजी गावीत यांची मतदानातून निवड झाली. पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार मंदार कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. निवडणुकी साठी काँग्रेस पक्षाकडुन सभापती पदासाठी बबीता गावीत व उपसभापती पदासाठी शिवाजी गावीत, तर भाजपकडून सभापतीपदासाठी गीता गावीत व उपसभापती पदासाठी राजु कोकणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बबीता गावीत यांना ११ मते व गीता गावीत यांना ८ मते मिळाली तर उपसभापती पदासाठी शिवाजी गावीत यांना ११ मते व राजु कोकणी यांना ८ मते मिळाली.

अक्कलकुवा पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम: अक्कलकुवा पंचायत समितीत काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले असून सभापतीपदी नानसिंग वळवी यांची तर उपसभापतीपदी मेलदीबाई वळवी यांची निवड झाली आहे. सभापती पदासाठी काँग्रेस तर्फे विजय पाडवी, नानसिंग वळवी तर भाजप तर्फे ॲड.सुधीर पाडवी यांनी अर्ज सादर केले होते. विजय पाडवी यांनी पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाने माघार घेतल्याने नानसिंग वळवी व सुधीर पाडवी यांच्यात सरळ लढत झाली. लढतीत वळवी यांना 13 तर सुधीर पाडवी यांना 7 मते मिळाली. उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या मेलदीबाई वळवी व शिवसेनेच्या अश्विनी वसावे यांच्यात लढत झाली त्यात मेलदीबाई वळवी यांना 13 तर अश्विनी वसावे यांना 7 मते मिळाली. अक्कलकुवा पंचायत समितीत एकुण 20 सदस्य आहेत त्यात 13 सदस्य काँग्रेसचे, 4 भाजपाचे तर 3 शिवसेनेचे आहेत.

तळोदा पंचायत समितीत काँग्रेसचे सभापती तर भाजपाचे उपसभापती: तळोदा पंचायत समितीचा दहा जागांसाठी अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे व भाजपचे पाच-पाच सदस्य निवडून आले होते. समसमान जागा निवडून आल्यानंतर माजी मंत्री पद्माकर वळवी आणि आमदार राजेश पाडवी यांच्या मध्यस्थीने अडीच-अडीच वर्षाचा फॉर्मुला निश्चित करण्यात आला होता. त्यात सुरुवातीच्या अडीच वर्षांसाठी भाजपचे यशवंत ठाकरे यांची सभापती तर काँग्रेसच्या लताबाई वळवी यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली होती. सदर कालावधी संपल्यामुळे नूतन सभापतीचा व उपसभापतीचा निवडीसाठी प्रक्रिया राबविण्यात आली. उपसभापती पदी भाजपचे विजयसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड झाली. तर सभापती पदासाठी काँग्रेसच्याच सोनीबाई पाडवी व लताबाई वळवी यांच्यामध्ये निवडणूक झाली. आवाजी मतदान घेतल्यानंतर सोनीबाई पाडवी यांना चार तर लताबाई वळवी यांना सहा मते मिळाली. निवडणुकीत भाजपच्या पाच सदस्यांनी लताबाई वळवी यांना मतदान केले.

शहादा पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा: शहादा पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे वीरसिंग हरसिंग ठाकरे तर उपसभापतीपदी भाजपच्या कल्पना श्रीराम पाटील यांची निवड झाली. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असूनही भाजपने पंचायत समितीवर सत्ता काबीज केली. सभापती पदासाठी चार व उपसभापती पदासाठी तीन नामांकन दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली. २८ सदस्यांपैकी सभागृहात भाजपचे १२ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक सदस्य असे एकूण १३ सदस्य उपस्थित होते. काँग्रेसचे १४ व राष्ट्रवादीचा एक सदस्य असे १५ सदस्य गैरहजर होते. काँग्रेसचे सदस्य उपस्थित नसल्याने सभापती व उपसभापती यांची निवडणूक एकतर्फी झाली. सभापतीपदी वीरसिंग ठाकरे तर उपसभापतीपदी कल्पना श्रीराम पाटील यांची निवड करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.