नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सततधार पाऊस सुरू आहे. सकाळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी रूममधील पीओपीचे सीलिंग कोसळले असून या ठिकाणी असलेल्या संगणक आणि आदी साहित्याचे नुकसान झाले आहे. मात्र सकाळची वेळ असल्याने अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने मोठी हानी टळली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. तर, अनेक जीर्ण इमारतींचे नुकसान झाले आहे. यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची इमारतीतील अधिकारी कार्यालयात सिलिंग वरील पीओपी कोसळली आहे.
या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी बसून आपले काम करीत असतात. मात्र सकाळच्या वेळेत सदर प्रकार घडल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, या ठिकाणी संगणकासह इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.