नंदुरबार - आदिवासी विकास विभागाचे नाशिक विभागीय अप्पर आयुक्त गिरीश सरोदे यांनी नंदुरबार येथे सेंट्रल किचनला भेट देऊन त्याची तपासणी केली आहे. गेली काही दिवस नंदुरबारमधील सेंट्रल किचन हे टीकेचे लक्ष ठरत होते, या पार्श्वभूमीवर सरोदे यांनी येथे भेट देऊन तपासणी केली.
अप्पर आयुक्त गिरीश सरोदे यांनी सेंट्रल किचनची तपासणी केल्यानंतर इथल्या अन्न-पदार्थांबाबत समाधान व्यक्त केले आहे. जुनपासुनच सुरू झालेल्या सेंट्रल किचनमध्ये काही काळ थोडी अनियमितता झाली होती. मात्र, आता सुधारणा झाली असुन आदिवासी विकास विभागाच्या ३२ आश्रमशाळेतील १० हजार विद्यार्थ्यांना जेवण पुरवले जात आहे. विद्यार्थ्यांना दर्जात्मक जेवण नाश्ता मिळत असल्याने इतर प्रकल्पातही सेंट्रल किचन पद्धत राबविण्याचा विचार असल्याचे आयुक्त गिरीश सरोदे यांनी सांगीतले.
आयुक्त गिरीश सरोदे यांची एकलव्य स्कुल येथे सदिच्छा भेट
सेंट्रल किचन भेटीनंतर आयुक्त गिरीश सरोदे यांनी जवळच असलेल्या एकलव्य स्कुलला सदिच्छा भेट दिली. यावेळी सरोदे यांनी विद्यार्थ्यांची प्रश्नोत्तराद्वारे अभ्यास चाचणी देखील घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरावर त्यांनी समाधान व्यक्त केले. सरोदे मास्तरांच्या या शाळेत विद्यार्थीही चांगलेच रमताना दिसुन आले.