ETV Bharat / state

Nandurbar Vaccination : लसीकरणाच्या टक्केवारीत नंदुरबार जिल्हा राज्यात शेवटी - गैरसमज

आदिवासी बहुल (Tribal-dominated) नंदुरबार जिल्ह्याची जानेवारीत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या (Corona vaccination) ड्रायरनसाठी निवड झाली. मात्र राज्यात सर्वात कमी लसीकरण याच जिल्हात झाले. सप्टेंबर महिन्यात फक्त 19 टक्के लसीकरण झाले होते. भौगोलीक परिस्थीती, (Geographical conditions) आदिवासी भागातील गैरसमज (Misunderstanding) अशा विपरीत परिस्थीतींवर मात करत सध्या प्रशासन लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी सकाळी लवकर तसेच रात्री दहापर्यंत मोहीम सुरू ठेवली आहे.

Nandurbar Vaccination
नंदुरबार लसीकरण
author img

By

Published : Dec 22, 2021, 2:35 PM IST

नंदुरबार: आदिवासी बहुल जिल्हा अशी ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये कमी झालेले लसीकरण जिल्हा प्रशासनासाठी डोके दुखीचा विषय ठरला आहे. लसीकरणाचा आकडा गाठण्यात प्रशासनाला अपयश आल्याने राज्यात लसीकरणाबाबत नंदुरबारचा क्रमांक हा सर्वात शेवटी लागला. याचे प्रमुख कारण म्हणजे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मजूर स्थलांतरित होत आहेत. त्याबरोबर लसीकरणा बाबत नागरिकांमध्ये भीती असल्यामुळे लसीकरणाची टक्केवारी स्थिर राहिली.

नंदुरबार लसीकरण

दुसरा डोस ३४.०४ टक्केच
जिल्ह्यात १४ लाख २० हजार २०० लोकांच्या लसीकरणाचे उदिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ०९ लाख ०५ हजार ४४७ नागरीकांनी पहिला डोस घेतला. हे प्रमाण ७१ टक्के इतके आहे. ४ लाख ६३ हजार ३६१ नागरींकाचा दुसरा डोस पुर्ण झाला आहे. दुसऱ्या डोसची टक्केवारीचे प्रमाण ३४.०४ टक्के इतकेच आहे. जानेवारीमध्ये सुरु झालेल्या लसीकरणाची ऑगस्ट पर्यतची आकडेवारी पाहता जिल्ह्यात आठ महिन्यात अवघे ३७.७४ टक्केच लसीकरण झाले होते. प्रशासनाने केलेल्या उपाय योजनांमुळे पुढच्या तीन महिन्यात ३३.४० टक्के लसीकरण झाले. यावरुनच प्रशासन लसीकरणाबाबत घेत असलेल्या मेहनतीची प्रचिती आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

ग्रामीण भागात जनजागृती आवश्यक
मुळातच आदिवासी बहुल भागात सुरुवातीपासुन लसीकरणाबाबत अफवां पसरल्या त्यामुळे नागरीकांनी लस घेणे टाळले. आजही अनेक जण लस घेण्यास टाळाटाळ करतात. तर दुसरीकडे भौगोलीक खडतर परिस्थीती, वाड्या वस्तांवर जाण्यासाठी नसलेले रस्ते, जिल्ह्यातुन मजुरी साठी होणारे स्थलांतराचे मोठे प्रमाण ही पण कमी लसीकरणाचे महत्वाचे कारण समोर येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासन विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे.

Nandurbar Vaccination
नंदुरबार लसीकरण
तीन वेळा व्यापक कॅम्प प्रशासनाने जिल्ह्यात तब्बल तीन वेळा लसीकरणाचा तीन दिवसीय व्यापक कॅम्प राबवला. या मधुन चांगले परिणाम देखील दिसुन आले. सुरुवातीच्या काळात शिक्षकांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातुन, कधी प्रसिद्ध लोककला असलेल्या सोंगाड्या पार्टीच्या माध्यमातुन तर कधी आदिवासी बोलीभाषेतुन प्रचार प्रसार करुन नागरीकांना लसीकरणाचा आग्रह धरला. ग्रामीण भागात त्यास काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला.रात्री लसीकरण शिबिर ग्रामीण भागात मोलमजुरीला जाणारा मोठा वर्ग लसीकरणला येत नसल्याचे लक्षात येताच. रात्रीच्या लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली. आरोग्य केंद्रनिहाय गावागावात शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा, आणि आरोग्य कर्मचाऱयांचे पथक रात्रीच्या वेळी मोल मजुरांच्या वस्त्या, वाड्या पाड्यांवर पोहचुन लसीकरण करत आहे. जेवढे लसीकरण दिवसा नोंदविल्या जात आहे. त्याहुन किंबहुना जास्तीचे लसीकरण हे रात्रीच्या कॅम्प मध्ये होत असल्याचे दिसुन येत आहे.लसीकरण कमी झाल्याचे प्रमुख कारणे- आदिवासी बहुल भागात लसीकरणाबाबतचे गैरसमज- काही विशीष्ट समाज आणि समुहांकडुन लसीकरणासाठी स्पष्ट नकार- नंदुरबार जिल्ह्याची भौगोलीक खडतर परिस्थीती. वाड्या पाड्यांवर विखुरलेला जनसमुदाय- नंदुरबार जिल्ह्यातुन मोलमजुरीसाठी गुजरात आणि राज्यातील इतर भागात स्थलांतरीत होणार मजुर वर्ग प्रभावी अंमलबजावणी नाहीमुळातच जिल्हा प्रशासनाने बॅकां, शासकीय कार्यालय आणि इतर ठिकाणी लसीकरणा न झालेल्यांना परवानगी न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होतांना दिसत नाही. अशातच वर्दळीचे ठिकाण, बाजारा मध्ये मास्क न घालता वावरणाऱ्यांची संख्या पाहता प्रशासनाने पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईची पावले उचलावी लागतील असे बोलले जात आहे. एकीकडे कोरोनाची न संपलेली भीती ओमायक्राॅनचा धोका अशातच लसीकरणा बद्दल नसलेली सतर्कता यामुळे डोंगरदऱ्या कापुन, जीप, बोट, पायपीट करुन दिवस रात्र मेहनत घेवुन सगळेच लसीकरणासाठी मेहनत घेत आहे. तिला साथ देवुन नंदुरबाचा लसीकरणाचा शेवटचा क्रमांक ही ओळख पुसण्यासाठी प्रत्येक नंदुरबारकराने पुढाकार घेण्याची गरज

हेही वाचा : Sarangkheda Yatra : घोडे बाजारात दोन दिवसात 60 लाखाची उलाढाल 11 लाखाला विकला 'कोहिनूर'व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.