ETV Bharat / state

मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी; 1,385 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान - नंदुरबार विधानसभा निवडणूक

जिल्ह्यातील चारही मतदारसंघात 1385 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांसाठी 6100 अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात झाली असून, मतदान केंद्रावर जाण्यासाठी कर्मचार्‍यांसाठी 107 बसेस, 606 जीप, 11 ट्रक तसेच 4 होड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी; 1385 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान
author img

By

Published : Oct 20, 2019, 5:44 PM IST

नंदुरबार - चार विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदान साहित्य पोहोचवण्यासाठी प्रशासनाने सुरुवात केली आहे. सकाळपासून शहरात पाऊस सुरू असल्याने प्रशासनाची धावपळ झाली. कर्मचाऱ्यांसाठी टाकण्यात आलेला मंडप ओला झाल्याने एकाच सभागृहातून साहित्य वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील चारही मतदार संघात 1385 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांसाठी 6100 अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात झाली असून, मतदान केंद्रावर जाण्यासाठी कर्मचार्‍यांसाठी 107 बसेस, 606 जीप, 11 ट्रक तसेच 4 होड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी; 1385 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात - 6, शहादा मतदारसंघात - 4, नंदुरबारमध्ये - 6, नवापूर विधानसभा मतदारसंघात 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. जिल्ह्यात एकूण 12 लाख 26 हजार 117 मतदार असून, यामध्ये 6 लाख 13 हजार 149 पुरूष, 6 लाख 12 हजार 955 महिला मतदार आहेत.

अक्कलकुवामध्ये 2 लाख 78 हजार 845, शहादा - 3 लाख 20 हजार 409, नंदुरबार - 3 लाख 38 हजार 941, नवापूर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 87 हजार 922 मतदार आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण 401 सैनिक मतदार असून, सर्वाधिक(157) नंदुरबार मतदारसंघात आहेत. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात 349, शहादामध्ये 335, नंदुरबारमध्ये 360, नवापूरमध्ये 336 मुख्य मतदार केंद्रे असून, 5 साहाय्यक मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातील मणिबेली, चिमलखेडी, धनखेडी, मुखडी, डनेल, बामणी, भादल, उडद्या, भाबरी मतदान केंद्रांवर होडीने जावे लागणार आहे. या निवडणुकीसाठी अक्कलकुवा मतदारसंघात 61, शहादा - 35, नंदुरबार - 36, नवापूरात 32 क्षेत्रिय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.

निवडणुकीसाठी 1706 ईव्हीएम मशिनचा वापर करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 2828 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली असून त्यांच्या सोयीसाठी 749 व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अक्कलकुवा मतदार संघातील मुखडी, झापी, बादल या मतदान केंद्रांवर तात्पुरते मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. 146 मतदान केंद्रांवर वेबकॉस्टिंग करण्यात येणार आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातील कोयली विहीर, नवागांव, सुकवेल हे अतिदुर्गम भागातील मतदान केंद्र आहेत.

आचारसंहिता कालावधीत 9056 लिटर मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत जवळपास 44 लाख आहे.

गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेला राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा काल(दि.१९ऑक्टो)ला दुपारी थंडावला आहे. या काळात आचारसंहितेच्या 12 तक्रारी प्रशासनाकडे आल्या असून, त्या निकाली काढण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.

Intro:नंदुरबार - जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदान साहित्य पोचविण्यासाठी प्रशासनाने सुरुवात केली आहे. मात्र सकाळपासून नंदुरबार शहरात पावसाची रिप रिप होती त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली कर्मचाऱ्यांसाठी टाकण्यात आलेला मंडप ओला झाल्याने एका सभागृहातून साहित्य वाटप करणयात आले. जिल्ह्यातील चारही मतदार संघात 1385 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांसाठी 6100 अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर जाण्यासाठी कर्मचार्‍यांसाठी 107 बसेस, 606 जीप, 11 ट्रक व 4 बार्जची व्यवस्था करण्यात आली आहे.Body: विधानसभा मतदानासाठी प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदार संघात 6, शहादा विधानसभा मतदार संघात 4, नंदुरबार विधानसभा मतदार संघात 6, नवापुर विधानसभा मतदार संघात 10 उमेदवार निवडणुक लढवित आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 12 लाख 26 हजार 117 मतदार असुन यात 6 लाख 13 हजार 149 पुरूष तर 6 लाख 12 हजार 955 महिला मतदार आहेत. यात अक्कलकुवा विधानसभेत 2 लाख 78 हजार 845, शहादा विधानसभेसाठी 3 लाख 20 हजार 409, नंदुरबार विधानसभेसाठी 3 लाख 38 हजार 941, नवापूर विधानसभेसाठी 2 लाख 87 हजार 922 मतदार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्याभरात एकुण 401 सैनिक मतदार असून सर्वाधिक नंदुरबार विधानसभेसाठी 157 मतदार आहेत. तर अक्कलकुवा मतदार संघात 43, शहादा मतदार संघात 146, नवापूर मतदार संघात 55 सैनिक मतदार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघासाठी 1385 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघासाठी 349, शहादा विधानसभा मतदार संघासाठी 335, नंदुरबार विधानसभा मतदार संघासाठी 360, नवापूर विधानसभा मतदार संघासाठी 336 व सहाय्यक मतदान केंद्र म्हणून 5 असे एकुण 1385 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांसाठी 6100 अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर जाण्यासाठी कर्मचार्‍यांसाठी 107 बसेस, 606 जीप, 11 ट्रक व 4 बार्जची व्यवस्था करण्यात आली आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातील मणिबेली, चिमलखेडी, धनखेडी, मुखडी, डनेल, बामणी, भादल, उडद्या, भाबरी मतदान केंद्रावर बार्जद्वारे जावे लागणार आहे. या निवडणूकीसाठी अक्कलकुवा मतदान संघात 61, शहादा मतदार संघात 35, नंदुरबार मतदार संघात 36, नवापूरात 32 क्षेत्रिय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली. विधानसभा निवडणुकीसाठी 1706 ईव्हीएम मशिनचा वापर करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात 2828 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली असून त्यांच्या सोयीसाठी 749 व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. अक्कलकुवा मतदार संघातील मुखडी, झापी, बादल या मतदान केंद्रांवर तात्पुरते मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. 146 मतदान केंद्रांवर वेबकॉस्टिंग करण्यात येणार आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातील कोयलीविहिर, नवागांव, सुकवेल हे अवघड मतदान केंद्र आहेत. आचारसंहिता कालावधीत 9056 लिटर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 44 लाख आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. गेल्या 15 दिवसांपासून सुरु असलेला राजकीय पक्षांचा प्रचार ज्वर काल दुपारी थंडावला. या काळात आचारसंहितेचा 12 तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.Conclusion:Nandurbar
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.