ETV Bharat / state

जिल्ह्यात नंदुरबार व शहादा बनले कोरोनाचे 'हॉटस्पॉट'

नंदुरबार शहर, तालुका तसेच शहादा शहर, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण 18,417 बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी नंदुरबार आणि शहादा येथे एकूण 14,743 बाधित झाले आहेत. तर जिल्ह्यात एकूण 5,655 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी नंदुरबार व शहादा येथील 4,439 रुग्ण उपचाराची आहेत.

नंदुरबार
नंदुरबार
author img

By

Published : Apr 2, 2021, 8:22 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक 1 ते 15 एप्रिल या दरम्यान संचारबंदी लागू केली आहे. नंदुरबार शहर, तालुका तसेच शहादा शहर, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण 18,417 बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी नंदुरबार आणि शहादा येथे एकूण 14,743 बाधित झाले आहेत. तर जिल्ह्यात एकूण 5,655 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी नंदुरबार व शहादा येथील 4,439 रुग्ण उपचाराची आहेत.

माहिती देताना अधिकारी

जिल्ह्यात नंदुरबार व शहादा 'हॉटस्पॉट'

जिल्ह्यात एकूण 18,417 बाधित रुग्ण आहेत. त्यात नंदुरबार व शहादा येथे एकूण 14,743 बाधित झाले आहेत. यात जिल्ह्यात एकूण 5655 रुग्ण उपचार घेत आहेत, त्यापैकी नंदुरबार व शहादा येथील 4439 रुग्ण उपचार घेत आहेत. तर नंदुरबार व शहादा मिळून 133 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. शहादा शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शहादा शहरासह तालुक्यात कोरोना चाचणी तपासणी केंद्र उभारण्यात आले आहेत. तर मोहिदा कोळी केंद्र येथे आरटीपीसीआर चाचणीसाठी केंद्र उभारण्यात आले आहे तरी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

नगरपालिकेतर्फे शहाद्यात बॅरिकॅडींग

शहादा येथील मुख्य बाजारपेठ परिसरात नागरिकांनी संचारबंदी च्या शेती काळात गर्दी करू नये यासाठी शहादा नगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य चौकात बॅरिकॅडींग करण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांची गर्दी होणार नाही व संसर्ग साखळी तोडण्यात प्रशासन यशस्वी होईल. शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधन यांच्यावतीने शहरातील प्रत्येक चौकात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे जेणेकरून नागरिक गर्दी करणार नाहीत, याकरिता पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी सांगितले आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे - प्रांताधिकारी

दिनांक 1 ते 15 एप्रिल या दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात लावण्यात आलेल्या संचारबंदी काळात नागरिकांनी सहकार्य करावे, जेणेकरून कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यास प्रशासनास मदत होईल. तसेच प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेले कोरोना चाचणी केंद्रात नागरिकांनी स्वतःहून आपली चाचणी करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहेत. कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास जिल्हा ग्रामीण रुग्णालय अथवा खासगी रुग्णालयात संपर्क साधून औषध उपचार करून कोरोना चाचणी करावी असेदेखील आवाहन शहादा येथील उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.