नंदुरबार - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालांच्या लागला. यानंतर आता जिल्हा परिषदेच्या सभागृहात बड्या नेत्यांच्या परिवारातील अनेक सदस्य दिसणार आहे. काँग्रेस आणि भाजपतर्फे दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांच्या परिवारातील सदस्य जिल्हा परिषदेच्या सभागृहात बसतील.
हेही वाचा - 'मुलगा दुसऱ्याच्या घरी झाला आणि पेढे हे वाटतायत'
हे सदस्य करणार जिल्हा परिषदेत प्रवेश
- आमदार शिरीषकुमार नाईक (आमदार, नवापूर) यांचे दोन्ही बंधू अजित नाईक आणि मधुकर नाईक
- भाजप नेते डॉ. विजयकुमार गावित यांच्या पत्नी आणि खासदार डॉ. हिना गावित यांच्या मातोश्री कुमुदिनी गावित
- आ. डॉ विजयकुमार गावित यांच्या लहान बंधूंची पत्नी विजया गावित त्यांच्या दोघी पुतण्या अर्चना गावित आणि राजश्री गावित (विजयकुमार गावित यांच्या परिवारातील 4 सदस्य जि. प. दिसणार आहेत)
- माजीमंत्री माणिकराव गावित यांचा मुलगा भरत गावित आणि सून संगीता गावित