ETV Bharat / state

Aamshya Padvi : आनंदाची शिधा किट वाटपावरून आमदार आमश्या पाडवी यांची शिंदे सरकारवर टीका - Shinde Govt promise to celebrate Diwali failed

शिंदे सरकारने दिवाळीसाठी आनंदाची शिधा किट वाटपाचा मोठा गाजावाजा करीत गोड दिवाळी साजरा करण्याचे आश्वासन ( Shinde Govt promise to celebrate Diwali failed ) दिले. मात्र अक्कलकुवा तालुक्यात अद्याप एकही शिधा ग्रहाकाला आनंदाची कीट मिळाली नसल्याने नागरिकांनी कीट अभावीच दिवाळी गोड साजरा केली असा आरोप विधान परिषदेचे आमदार आमच्या पाडवी यांनी राज्य सरकारवर केला ( Distribution of Ananda ration kit delayed ) आहे.

Ananda ration
आमश्या पाडवी
author img

By

Published : Oct 24, 2022, 6:50 PM IST

नंदुरबार : शिंदे सरकारने दिवाळीसाठी आनंदाची शिधा किट वाटपाचा मोठा गाजावाजा करीत गोड दिवाळी साजरा करण्याचे आश्वासन ( Shinde Govt promise to celebrate Diwali failed ) दिले. मात्र अक्कलकुवा तालुक्यात अद्याप एकही शिधा ग्रहाकाला आनंदाची कीट मिळाली नसल्याने नागरिकांनी कीट अभावीच दिवाळी गोड साजरा केली असा आरोप विधान परिषदेचे आमदार आमच्या पाडवी यांनी राज्य सरकारवर केला ( Distribution of Ananda ration kit delayed ) आहे.

Aamshya Padvi

नागरिकांना प्रतीक्षा आनंदाची शिधाकिटची : महाराष्ट्र शासनाची बहुचर्चित आनंदाची शिधा या शंभर रुपयाच्या किटला अक्कलकुवा तालुक्यातील रेशन दुकानदारांपर्यंत पोहचविण्याचे, काम सुरू आहे. मात्र लक्ष्मी पूजनाच्या दिवसापर्यंत किटमधील पूर्ण वस्तू न आल्याने तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना अद्यापपर्यंत आनंदाची शिधा मिळाली नसल्याने गरीब आणि गरजू नागरिकांची दिवाळी गोड होण्याऐवजी आनंदावर विरजन ( No ration kit allot to in Nandurbar ) पडले.

रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचले नाही आनंदाचे किट : अक्कलकुवा तालुक्यात एकुण 201 स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यात अंत्योदयचे 18862 तर प्राधान्य क्रमाचे 22004 असे एकूण 40866 शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना आनंदाची शिधा वाटपासाठी एकूण 40,866 किलो साखर तर तेवढेच पामतेल, रवा, चनाडाळ याची आवश्यकता आहे. मात्र शुक्रवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत संबंधित यंत्रणेकडून 31 हजार 800 लिटर पामतेल, 19 हजार 500 किलो रवा, तर 24 हजार 750 किलो चनाडाळ प्राप्त झाली आहे.त्यापैकी चनाडाळ ही शुक्रवारी दुपारी गोडाऊनला आल्याने ती रेशन दुकानदारांपर्यंत पोहचलेली नव्हती. तालुक्यातील काही रास्त धान्य दुकानांत पाम तेल, रवा, चनाडाळ पोहोच करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत साखरेची उपलब्धता दुकान दारांनाच न झाल्याने तालुक्यातील शिधा पत्रिकाधारक हे दिवाळीच्या पर्वात आनंदाच्या शिधा पासून वंचित झाले आहेत. त्यामुळे शासनाच्या या बहुचर्चित योजनेचा अक्कलकुवा तालुक्यात बोजवारा झाल्याचे चित्र आहे.

तक्रार अधिकारीच उपलब्ध नाही : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आनंदाची गीत संदर्भात कुठलीही तक्रार असल्यास प्रत्येक तालुक्यात अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. मात्र अक्कलकुवा तहसील कार्यालयात संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने माहिती कोणाकडून घ्यावी असा सवाल देखील सामान्य नागरिक विचारत आहे. अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी अक्कलकुवा तहसिल कार्यालयात फेरी मारली असता. सुट्ट्या असल्याने कार्यालयाला कुलुप होते. त्यामुळे पुढील वस्तू उपलब्धता व वितरण याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.