ETV Bharat / state

नंदूरबारमध्ये विवाहित प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या - नवापूर

सोमुवेल गावित आणि सपना गावित असे आत्महत्या केलेल्या युगुलाचे नाव आहे. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नंदूरबारमध्ये विवाहित प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : May 16, 2019, 6:10 PM IST

नंदूरबार - नवापूर तालुक्याच्या डाबरीफळी तिळासर येथील एका विवाहित प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सोमुवेल गावित आणि सपना गावित असे आत्महत्या केलेल्या युगुलाचे नाव आहे. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कसे जुळले प्रेमसंबंध -
नवापूर तालुक्यात डाबरीफळी तिळासर येथील सोमुवेल सुदाम गावित (वय 34) आणि सपना निलेश गावित (वय 32) हे दोघेही अंठीपाडा येथे एका गूळ उत्पादन कारखान्यात काम करत होते. याच ठिकाणी दोघांचे प्रेम संबंध जुळले. ही बातमी सपनाच्या पतीला कळल्यावर या दोन्ही प्रेमी युगलांनी 14 मे रोजी नाशिक येथे पळ काढला.

दोन दिवसानंतर सोमुवेल गावित याने त्याचे वडील सुदाम गावित यांना फोनवरून विवाहित सपना गावित हिच्याशी प्रेमसंबंधाची माहिती दिली. महत्वाचे म्हणजे दोघांचेही लग्न झालेले आहे. सपनाला एक 3 वर्षाची मुलगी देखील आहे. तरी त्यांचे प्रेमसंबंध जुळल्याने ते नाशिक येथे पळून गेले होते.

त्यानंतर सोमुवेल गावित याने मी सपना सोबत नाशिकहून येत आहे, मला पिंपळनेर येथे घेण्यास या, असे वडील सुदाम यांना सांगितले. आल्यावर त्याने वडील सुदाम यांना सर्व हकिकत सांगितली. तेव्हा वडिलांनी गावातील पोलीस-पाटील यांना याची माहिती दिली. सकाळी यावर आपण निर्णय घेऊ, असे सांगत पोलीस-पाटलांनी सगळ्यांना झोपण्यास सांगितले.

आत्महत्या केल्याचे कसे कळाले -
पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सपनाची 3 वर्षाची मुलगी रडत असल्याचे जाणवल्यावर घरातील मंडळींनी सोमुवेल यांच्या खोलीत जाऊन पाहिले. तेव्हा सोमुवेल आणि सपना त्या खोलीत नव्हते. शोधशोध केल्यानंतर शेतातील आंब्याच्या झाडाला दोघांचे मृतदेह लटकल्याचे निदर्शनात आले. त्या दोघांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. आपल्या प्रेमसंबंधाला समाज मान्यता देईल की नाही या विचाराने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेची सुदाम गावित यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

नवापूर तालुक्यात डाबरीफळी तिळासर येथील सोमुवेल सुदाम गावित वय 34 आणि सपना निलेश गावित वय 32 राहणार अंठीपाडा हे दोघेही अंठीपाडा येथे एका गूळ उत्पादन कारखान्यात काम करत होते याचठिकानी दोघांचे प्रेम संबंध जुळले ही बातमी सपनाच्या पतीला कळल्यावर या दोन्ही प्रेमी युगलांनी दिनांक 14 मे रोजी नाशिक येथे पळ काढला.

दोन दिवसानंतर सोमुवेल गावित याने त्याचे वडील सुदाम गावित यांना फोनवरून विवाहित सपना गावित हिच्याशी प्रेमसंबंधाची माहिती दिली. हे दोघेही वेगवेगळ्या सोबत विवाहित असून सपनाला एक 3 वर्षाची मुलगी देखील आहे .तरी त्यांचे प्रेमसंबंध जुळल्याने ते नाशिक येथे पळून गेले होते.

 दोन दिवसानंतर वडील सुदाम गावित यांना फोनवरून माहिती दिली त्यानंतर सोमुवेल गावित याने आम्ही सपना सोबत नाशिक हून येत आहे तरी पिंपळनेर येथे  घेण्यास बोलावले. रात्री 10 वाजेला पिंपळनेर येथून आपल्या घरी बारा वाजेपर्यंत आल्यानंतर दोघांनीही सर्व हकिकत सांगितली.वडिल सुदाम गावित यांनी गावातील पोलीस पाटील यांना  प्रेमसंबंधाची हकीगत सांगून गावातील जाती रिवाजाप्रमाणे पंचमंडळी बसून पंचाचा जो निर्णय येईल त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ असं समजवल्यानंतर सर्वजण जेवण करून रात्री झोपले.पहाटे 4 वाजेच्या सुमारास सपनाची 3 वर्षाची लहान मुलगी रडत असल्याचे जाणवल्यावर उठून पाहिले असता सोमुवेल व सपना दोघेही अंथरुणावर दिसून आले नाही. त्यावेळी त्यांचा शोध घेतला असता शेतातील बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडाला त्या दोघांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

सोमुवेल आणि त्याची प्रेयसी सपना यांचे प्रेमसंबंध होते व त्यांना त्यांच्या प्रेमसंबंधाला समाज मान्यता देईल अथवा नाही असे विचार मनात येत असावेत त्यांनी त्या खराब मनस्थितीत विचार करून दोघांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज नातेवाइकांनी सांगितला.

 विसरवाडी पोलीस ठाण्यात आत्महत्या आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली सुदाम गावित यांच्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विनायक सोनवणे, संजय सावळे अधिक तपास करीत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.