ETV Bharat / state

नंदुरबार : सारंगखेडा यात्रोत्सवात देशभरातील अश्व व्यापाऱ्यांच्या सहभाग - घोडे बाजार

सारंगखेडा येथे सुरू असलेला चेतक फेस्टीव्हलकडे सरकारने पाठ फिरवल्याने निधी उपलब्ध झाला नाही. यामुळे अश्व शौकिनांनी लोकसहभागातून अश्व स्पर्धा भरविली आहे.

घोडे बाजारातील घोडे
घोडे बाजारातील घोडे
author img

By

Published : Dec 14, 2019, 6:27 PM IST

Updated : Dec 14, 2019, 7:43 PM IST

नंदुरबार - देशातील सर्वात मोठ्या घोडे बाजाराला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तीन वर्षे सरकारने सारंगखेडा येथील चेतक फेस्टीव्हलला मदत केली. मात्र, यावेळी मदत नाकारली गेली. पण, चेतक फेस्टीव्हलमधील सर्व अश्व स्पर्धा लोकसहभागातून होणार असून त्यासाठी परिसरातील अश्व प्रेमींनी लाखो रुपयांचा निधी उभारला आहे. तर देशभरातून आलेल्या व्यापारी आणि अश्व शैकिनांनी सरकारने या फेस्टीव्हलकडे सकारात्मक पहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सारंगखेडा यात्रोत्सवात देशभरातील अश्व व्यापाऱ्यांच्या सहभाग

सारंगखेडा घोडे बाजार नियोजन आणि सुरक्षितता यासाठी देशभरातील अश्व व्यापाराच्या पसंतीला उतरला आहे. त्यासोबतच या बाजारात चेतक फेस्टीव्हल अंतर्गत होणाऱ्या घोड्यांच्या विविध स्पर्धा आणि त्यातील लाखोंची बक्षिसे असतात. यामुळे यावर्षी राज्यसरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत असून याला अजून मदत करावी, अशी अपेक्षा घोडे व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यावर्षी बाजारात जातिवंत घोडे विक्रीसाठी आले असून बाजारात मोठी आवक आहे. त्यासोबतच पांढरा नुखरा घोडे कमी झाले असून मारवाड जातीचे जातिवंत घोड्याची आवक वाढली आहे. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारने मदत नाकारली असली तरी परिसरातील अश्व शैकिनांनी लोकसहभागातून चेतक फेस्टीव्हलमधील सर्व स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणारी बक्षिसे आणि इतर असा 35 लाखांचा निधी उभारण्यात येत आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

हेही वाचा - सारंगखेडा चेतक महोत्सवात दोन दिवसात ७५ लाखांची उलाढाल

देशभरातून आलेल्या अश्व शौकिनांना येथील घोडे बाजार भुरळ घालत असतो. इतक्या मोठ्या प्रमाणात जातिवंत जनावरे एकाच ठिकाणी पाहण्याचा भाग्य लाभत असल्याचे अश्व शौकीन सांगतात.

देशातील सर्वात मोठा घोडेबाजार आणि त्याला लाभलेली इतिहास काळातील परंपरा आहे. या घोडेबाजाराला भेट देणारे देश विदेशातील पर्यटक ही राज्याची सर्वात मोठ्या परंपरेकडे सरकारने राजकीय चष्म्यातून पाहू नये ही अपेक्षा राज्यातील अश्वशौकीन करत आहेत.

हेही वाचा - आदिवासींच्या 'डोंगऱ्यादेव उत्सवा'ला उत्साहात सुरुवात

Intro:नंदुरबार - देशातील सर्वात मोठ्या घोडे बाजाराला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तीन वर्ष सरकारने सारंगखेडा येथील चेतक फेस्टीव्हल ला मदत केली मात्र यावेळेस मदत नाकारली गेली मात्र चेतक फेस्टीव्हल मधील सर्व अश्व स्पर्धा लोकसहभागातून होणार असून त्यासाठी परिसरातील अश्व प्रेमींनी लाखो रुपयांचा निधी उभारला आहे...तर देशभरातून आलेल्या व्यापारी आणि अश्व शोकिणानी सरकारने या फेस्टीव्हल कडे सकारात्मक पहावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Body:सारंगखेडा घोडे बाजार नियोजन आणि सुरक्षितता या साठी देशभरातील अश्व व्यापाराच्या पसंतीला उतरला आहे. त्याच सोबत या बाजारात चेतक फेस्टीव्हल अंतर्गत होणाऱ्या घोड्यांच्या विविध स्पर्धा आणि त्यातील लाखोंची बक्षिसे यामुळे मात्र यावर्षी राज्यसरकारने या कडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत असून याला अजून मदत करावी अशी अपेक्षा घोडे व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यावर्षी बाजारात जातिवंत घोडे विक्रीसाठी आले असून बाजारात मोठी आवक आहे त्याच सोबत पांढरा नुखरा घोडे कमी झाले असून मारवाड जातीचे जातिवंत घोड्याची आवक वाढली आहे यावर्षी चे वैशिष्ट म्हणजे सरकारने मदत नाकारली असली तरी परिसरातील अश्व शोकिनानी लोकसहभागातून चेतक फेस्टीव्हल मधील सर्व स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी लागणारी बक्षिसे आणि इतर असा 35 लाखाचा निधी उभारण्यात येत आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

देशभरातून आलेल्या अश्व शोकिना येथील घोडे बाजार भुरळ घालत असतो इतक्या मोठ्या प्रमाणात जातिवंत जनावरे एकाच ठिकाणी पाहण्याचा भाग्य लाभत असल्याचं अश्व शोकीन सांगतात.

Byte - रोहित पाटील
घोडे व्यापारी

Byte:- जयपालासिंह रावल
अध्यक्ष - चेतक फेस्टीव्हल, सारंगखेडाConclusion:देशातील सर्वात मोठा घोडेबाजार आणि त्याला लाभलेली इतिहास काळातील परंपरा त्याला भेट देणारे देश विदेशातील पर्यटक ही राज्याची सर्वात मोठ्या परंपरे कडे सरकारने राजकीय चष्म्यातून पाहू नये ही अपेक्षा..
Last Updated : Dec 14, 2019, 7:43 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.