नंदुरबार Literacy Day 2023 special story : नंदुरबार जिल्हा हा अतिदुर्गम भागात वसलेला आहे. हा जिल्हा मानव निर्देशांकाच्या पट्टीवर विकासाच्याबाबतीत पिछाडीवर आहे. जिल्हा निर्मितीची २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करण्यात येतंय. तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील आर्थिक दुर्बलता विकासात अडसर ठरत आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. नंदुरबार जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नाहीत. त्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून असलेली निरक्षरता आजही कायम आहे.
६४ हजार नागरिकांना साक्षरतेचं मिशन : नंदुरबार जिल्हा विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. तरी रोजगारासाठीचे कोणतेही मोठे प्रकल्प जिल्ह्यात नसल्यामुळे स्थलांतर होतंय. ते साक्षरतेत अडसर ठरतंय. यामुळंच जिल्हा निर्मितीच्या २५ वर्षानंतर देखील साक्षरतेचं प्रमाण अवघं ६४ टक्के आहे. तब्बल ३६ टक्के नागरिक निरक्षर असल्याचं धक्कादायक वास्तव येथे आहे. देश एका बाजूला चंद्रयान, सूर्ययान मोहिम यशस्वी करत आहे. तर दुसऱ्या बाजूला देशातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ असणाऱ्या जिल्ह्यात निरक्षरतेचं मोठं प्रमाण हे दुर्दैवच म्हणावं लागंल.
सन २०११ च्या गणनेनुसार साक्षरता : सन 2011 च्या गणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात 64 टक्के साक्षरता असल्याची नोंद आहे, तर त्यापूर्वी साधारण 58 टक्के साक्षरता होती. साक्षरतेत वाढ होण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीनं विविध उपाययोजना व जनजागृती करण्यात येतेय. शिक्षण विभागाच्यावतीनं नवसाक्षर अभियान राबविण्यात येतंय. या माध्यमातून यंदा 64 हजार नागरिकांना साक्षर करण्याचा निर्धार करण्यात आलाय, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष चौधरी यांनी दिलीय.
स्थलांतरामुळे साक्षरतेत अडसर : नंदुरबार जिल्ह्यात साधारणत: 36 टक्क्याहून अधिक निरक्षरता असल्यानं राज्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. शाळाबाह्य विद्यार्थी संख्या जास्त असल्यानं निरक्षरतेच्या प्रमाणात वाढ झालीय. त्याचप्रमाणं जिल्ह्यात रोजगार नसल्यामुळं विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचं कामानिमित्त स्थलांतर होतं. यात महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण कमालीचे कमीय. त्यातच आश्रमशाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. रोजगार नसल्यानं स्थलांतरामुळे निरक्षरता कमी करणं, आव्हान ठरत आहे. यामुळं स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. (36 percent illiterate in Amravati district)
निरक्षरतेचे मुख्य कारण : नंदुरबार जिल्ह्यात साधारण 36 टक्के पेक्षा जास्त निरक्षरता असल्यानं राज्यात पहिल्या नंबरवर नोंद झालीय. याचं मुख्य कारण म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थी संख्या जास्त आहे. त्यामुळं निरक्षरतेच्या प्रमाणात वाढ झालीय. त्याचप्रमाणं जिल्ह्यात रोजगार नसल्यामुळं विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचे कामानिमित्त स्थलांतर होतं, हे मुख्य कारण असल्याचं शिक्षण विभागाच्या निदर्शनास आलंय. तसंच कुटुंबाची आर्थिक स्थिती दुर्बल असल्यामुळं मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत असल्याचं शिक्षण तज्ञांकडून सांगितले जातंय.
प्रशासनाकडून जनजागृती : जिल्ह्यात साक्षरतेचं प्रमाण वाढावं, याकरिता जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतात. त्याचप्रमाणं जनजागृती देखील केली जातेय, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिलीय. साक्षरता जिल्ह्यात वाढवता यावी, यासाठी जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाकडून नवभारत शिक्षण योजना सुरू करण्यात आलीय. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना व नागरिकांना शिक्षणाबाबत आवड निर्माण व्हावी, याकरिता उपाययोजना केल्या जात आहेत.
हेही वाचा :
- 100 percent Hinde Leteracy: हिंदीला विरोध होत असताना दुसरीकडे केरळातील 'हे' गाव होणार १०० टक्के हिंदी साक्षर
- नंदुरबारमध्ये "महिला डिजिटल साक्षरता अभियान" कार्यशाळा संपन्न
- Financial Literacy In BMC Schools : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये देणार आर्थिक साक्षरतेचे धडे, शेअर मार्केटची सफर : मंत्री आदित्य ठाकरे