नंदुरबार - तळोदा शहरातील अमरधाम जवळील गॅरेजमध्ये बिबट्याचे बछडे आढळून आले आहे. ही बछडे रात्रीच्या सुमारास गॅरेजमध्ये जात असल्याचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाने बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
तळोदा शहरातील शहादा रस्त्यावरील अमरधाम जवळ जे. के. गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये रात्री बिबट्याचे बछडे जात असल्याचे चित्रीकरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे. बिबट्याचे बछडे दुकानात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गॅरेजमध्ये बिबट्याचे बछडे आढळल्याचे गॅरेजचे मालक जलील अन्सारी यांनी सांगितले. वनविभागाने बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा... भारत-चीन सैन्य मारहाण प्रकरण: भारतीय सैन्यातील आणखी चार जवान गंभीर
गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकरीच्या ठार झाला होता. तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. रांझणी परिसरातील शेतामध्ये बिबट्यांची बछडे वन विभागाला सापडले होते. तसेच अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. परिसरातील नागरिक, शेतकरी व शेतमजूर यांच्यात मोठ्याप्रमाणावर भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या भीतीने शेतीकामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.