ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात लहानगी ठार; झोपडीतून नेले फरफटत - nandurbar jungle news

बिबट्याने हल्ला करून झोपडीत झोपलेल्या 6 वर्षांच्या लहानगीला खेचून नेल्याची घटना तळोदा तालुक्यातील सोजरबार येथे घडली. बिबट्याने पहाटेच्या सुमारास झोपडीवर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्याची ही तीन महिन्यांतील दुसरी घटना घडली आहे.

leopard attacks in nandurbar
बिबट्याने हल्ला करून झोपडीत झोपलेल्या 6 वर्षांच्या लहानगीला खेचून नेल्याची घटना तळोदा तालुक्यातील सोजरबार येथे घडली.
author img

By

Published : Jul 17, 2020, 9:38 AM IST

नंदुरबार - बिबट्याने हल्ला करून झोपडीत झोपलेल्या 6 वर्षांच्या लहानगीला खेचून नेल्याची घटना तळोदा तालुक्यातील सोजरबार येथे घडली. बिबट्याने पहाटेच्या सुमारास झोपडीवर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्याची ही तीन महिन्यांतील दुसरी घटना घडली आहे.

तळोदा तालुक्यातील सोजरबार येथे एका झोपडीत शिला भीमा नाईक (वय 6 वर्ष) ही बालिका खाटेवर झोपली होती. ती निद्रावस्थेत असतानाच पहाटे 4 वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. झोपडीच्या बांबूचा दरवाजा तोडून बिबट्याने आत प्रवेश केला. यावेळी खाटेवर झोपलेल्या शिला नाईक या बालिकेला बिबट्याने जबड्यात पकडून तब्बल 200 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. यावेळी चिमुकलीच्या ओरडण्याचा आवाज येताच तिच्या वडिलांसह नजीकच्या लोकांनी तत्काळ बिबट्याचा पाठलाग केला. यावेळी बिबट्याने फरफटत नेलेल्या बालिकेला त्याच ठिकाणी सोडून तो पसार झाला.

बिबट्याने बालिकेच्या गळ्यावर, डोक्यावर व पार्श्‍वभागावर जखमा केल्याने गंभीर जखमी असलेल्या बालिकेला तत्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र बालिकेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच तळोद्याचे प्रभारी वनक्षेत्रपाल सी.डी.कासार, सहाय्यक वनसंरक्षक कापसे, अक्कलकुव्याच्या वनक्षेत्रपाल सोनाली गिरी, वनरक्षक एस.आर.देसले, वनपाल श्रावण कुंवर, वसावे, मोहन वळवी, बोरदचे वनपाल आनंद पाटील, वनरक्षक आर.जे.शिरसाठ, वीरसिंग पावरा, राजा पावरा यांनी घटनास्थळी भेट दिली.

यापूर्वी देखील बिबट्याने परिसरात कोंबड्या, शेळ्या, गायी व म्हशींवर हल्ला केला होता. त्यामुळे वनविभागाने बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, बालिकेचे वडील भिमा चांद्या नाईक यांनी तळोदा पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. पहाटेच्या सुमारास झोपडीत झोपलेल्या शिलाबाई या मुलीवर बिबट्याने हल्ला करुन तिला फरफटत नेल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानुसार तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.