ETV Bharat / state

शहादाजवळ बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, जीप उलटल्याने ५ जण जखमी - नंदुरबार अपघात बातमी

शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील वैजाला गावच्या चौफुलीवर बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीचा अपघात झाला. यातील चारचाकी चालक फरार झाला असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jeep-bike-accident-in-nandurbar
जीपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू...
author img

By

Published : Feb 27, 2020, 9:57 AM IST

नंदुरबार- शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील वैजाला गावच्या चौफुलीवर बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार 15 ते 20 फुट लांब अंतरावर जाऊन पडला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. तर चारचाकी पलटी झाल्याने अन्य 5 जण जखमी झाले आहेत.

जीपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू...

हेही वाचा- दिल्ली हिंसा : पोलिसांकडून हेल्पलाईन क्रमांक जारी , 106 जणांना अटक तर 18 जणांवर एफआयआर दाखल

काशिनाथ शंकर चौधरी हे दुचाकीने (एमएच 39 एक्स 6205) वैजाली गावाकडून प्रकाशाकडे येत होते. याचवेळी शिरपूर तालुक्यातील मालकातर येथून याहामोगी येथे दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या एका चारचाकी गाडीने (एमपी 46 बीए 4628) त्यांना धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार 15 ते 20 फुट लांब अंतरावर जाऊन पडला. यात काशिनाथ गंभीर जखमी झाला होता. तर चारचाकीही रस्त्याच्या कडेला उलटली. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

दुचाकीस्वार काशिनाथ चौधरी यांची प्रकृती पाहता पुढील उपचारासाठी त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर चारचाकी गाडीतील लाकडीबाई कादर्‍या पावरा, मिनाबाई नारायण पावरा, ललिता बर्डे, नारायण गणा पावरा, महेश नारायण पावरा हे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर प्रकाशा आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. तर काही जखमींना शहादा येथे हलविण्यात आले.

दरम्यान, चारचाकी चालक फरार झाला असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.