ETV Bharat / state

संचारबंदी कालावधीत नाशवंत वस्तूंच्या दुकानासाठी वेळेत वाढ

कोविड-19 संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात 31 मार्च रोजी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलेल्या पूर्णत: संचारबंदीच्या कालावधीत नाशवंत वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 11 ऐवजी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.

नंदुरबारमध्ये  नाशवंत वस्तूंच्या वेळेत वाढ

author img

By

Published : Apr 1, 2021, 2:35 PM IST

नंदुरबार - कोविड-19 संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात 31 मार्च रोजी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलेल्या पूर्णत: संचारबंदीच्या कालावधीत नाशवंत वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 11 ऐवजी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर निर्णय

सुधारीत आदेश
यापूर्वीच्या आदेशात आस्थापना सुरु ठेवण्यासाठी सकाळी 7 ते 11 या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता मिठाई, बेकरी पदार्थ, चिकन, मटण, मासे, फळे, भाजीपाला, रसवंतीगृह, शासकीय आधार केंद्र, सुरू ठेवता येईल. तसेच सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ यांना घरपोच पार्सल सेवा देण्यास सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मुभा राहील.

भाजीपाला मार्केट वेळेत बदल
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या महात्मा फुले भाजीपाला मार्केट मध्ये होणाऱ्या दोन वेळेच्या लिलावात बदल करण्यात आला आहे.आता दिवसभरातून एकदा लिलाव सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

धान्य मार्केट बाबत निर्णय
मार्च एंडिंग असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या मिरची मार्केट व धान्य मार्केट चार तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा बाजार समितीने निर्णय घेतला आहे. पाच तारखेनंतर बाजार समिती याबाबत निर्णय घेऊन वेळेत बदल करावा की नाही याबाबत विचार करेल, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.