नंदुरबार - नवापूर शहरातील रेल्वे गेटजवळ गहू आणि तांदळाची अवैध वाहतूक करणारा ट्रक नंदुरबार गुन्हे अन्वेषण विभागाने पकडली. महाराष्ट्रातून गुजरातकडे हा ट्रक जात असताना ही कारवाई करण्यात आली. ट्रकमध्ये 350 गोणी गहू आणि 30 गोणी तांदूळ भरलेले होते.
धान्याची अवैधरीत्या वाहतूक करणारी ट्रक गुजरातकडे जात असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्याआधारे संबंधित ट्रकचा पाठलाग केला. नवापूर रेल्वे गेटजवळ अधिकाऱ्यांनी ट्रकची तपासणी केली. गहू आणि तांदळाच्या एकूण 380 गोणी धान्य आढळून आले.
हेही वाचा - 24 आणि 25 डिसेंबरला राज्यातील काही भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंंदाज
याबाबत ट्रक चालकाकडे मालाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी अवैध धान्याचा ट्रक जप्त केला. ट्रकमधील धान्याचे नमुने महसूल विभागाच्या पुरवठा विभागाकडे तपासणीसाठी देण्यात आले आहेत. ट्रकमधील माल हा नवापूर शहरातील शर्मा नावाचा एका व्यापाऱ्याच्या आहे. याबबात अधिक तपास सुरू आहे.