ETV Bharat / state

खबरदार..! विनाकारण घराबाहेर पडाल तर होणार कारवाई; नंदुरबारमध्ये 300 पेक्षा अधिक वाहने जप्त

नंदुरबार शहर वाहतूक शाखेच्या वतीने दोन दिवसात 300 पेक्षा आधिक वाहने जप्त केली आहेत. यात अडीच लाखापेक्षा अधिकचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, या मोहिमेच्या मागील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भूमिका चांगली असली तरी वाहतूक पोलिसांच्या अरेरावीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

if-unnecessary-left-home-traffic-police-action-in-nandurubar
विनाकारण घराबाहेर पडाल तर होणार कारवाई
author img

By

Published : Apr 3, 2020, 10:05 AM IST

नंदुरबार- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, काही नागरिक घराबाहेर येत आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विनाकारण बाहेर आल्यास वाहने जप्त करण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

विनाकारण घराबाहेर पडाल तर होणार कारवाई

हेही वाचा- अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आ़कडा 2 लाखांच्या पुढे; 5 हजार मृत्यू

नंदुरबार शहर वाहतूक शाखेच्या वतीने दोन दिवसात 300 पेक्षा आधिक वाहने जप्त केली आहेत. यात अडीच लाखापेक्षा अधिकचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, या मोहिमेच्या मागील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भूमिका चांगली असली तरी वाहतूक पोलिसांच्या आरेरावीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तर काही ठिकाणी अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची वाहने जप्त केल्याचा घटना घडल्या आहेत. एकंदरीतच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना देखील वाहतूक शाखेकडून जायबंदी केले जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 10 वा दिवस आहे.

रविवारी 5 एप्रिलला रात्री नऊ वाजता. मला तुमचे नऊ मिनिट हवे आहेत. घरातल्या सगळ्या लाईट बंद करुन मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट लावून दरवाजात किंवा बाल्कनीत उभे रहा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. कोरोना संकटाशी लढण्यासाठीचा मोदींचा हा नवा उपक्रम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.