नंदुरबार - सातपुडयातील रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या Sugar Apple सिताफळे शहादा व तळोद्यातील बाजारात दाखल झाला असून सीताफळ मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत आहेत. राज्यासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील खवैय्ये व व्यापाऱ्यांकडून सातपुड्यातील सिताफळाची मोठी मागणी होऊ huge demand for Sitaphal in Satpura लागली आहे. गोडवा चाखायला मिळणार आहे, भाव समाधानकारक मिळत आहे. या दोन महिन्यातील हंगामात सातपुड्यातील आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होत असतो.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे आहेत. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले सिताफळ बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले असून या सीताफळांना जिल्ह्यात आणि राज्यभरात मोठ्या प्रमाणात मागणी असते.
सिताफळ हंगामात आदिवासी बांधवांना मिळतो रोजगार सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सिताफळांचा हंगाम सुरू होत असतो. तो दोन महिने सुरू असतो. या हंगामात सातपुड्यातील तीन ते चार हजार आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होत असतो. जिल्ह्यातील मोठ्या गावात आणि शहरांमध्ये धडगाव अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यातील आदिवासी बांधव सीताफळ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यभरातील व्यापारी जागेवरच सिताफळांची खरेदी करत आहे. बाजारपेठेत सातपुड्यातील चवदार आणि गोड सीताफळांना चाळीस ते पन्नास रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे हा रानमेवा खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
नैसर्गिक सीताफळांना मोठ्या प्रमाणावर मागणी धड़गांव तालुक्यात व तळोदा तालुक्याच्या हद्दीत सातपुड्याच्या पर्वत रांगा टेकड्यात लांखो सिताफळांची झाडे आहेत. आदिवासी शेतकऱ्यांनी घरांच्या वाड्यात शेतांच्या बांधावर गावरान सिताफळांची लाखो झाडांची लागवड करून रासायनिक खतांचा न वापर करता संगोपन केलेले आहेत. नैसर्गिक रित्या पिकलेले सातपुड्यातील रानमेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावरान सिताफळ गोडवा अधिक असते. राज्यसह गुजरात, मध्यप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
विक्रीस येण्यास सुरुवात सातपुड्यात झाडावर पिकलेली, ताजी, रसाळ फळे सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यातील आदिवासी बांधव शहादा व तळोद्यातील बाजारपेठ जवळ खवैय्ये व व्यावसायिक खरेदीदारांकडून अधिक गर्दी असते. तसेच मागणी मोठ्या प्रमाणावर होत असते. म्हणून तळोद्यातील बिरसा मुंडा चौक, चिनोदा कोठार रस्त्यावर आदिवासी बांधव सिताफळ टोपल्यात बांधून पहाटे विक्रीसाठी येत असतात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येणारा सिताफळ यावर्षी ऑक्टोंबर महिन्यापासून विक्रीस येण्यास सुरुवात झाली आहे. एका टोपलीस तिनशे ते साडेतीनशे रुपयांपर्यंत विक्री होत आहे.