नंदुरबार - पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, शहादा शहरात मुसळधार असा पाऊस झाल्याने सकल भागात पाणी साचले आहे.
हवामान खात्याने जिल्ह्यात दमदार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली होती. गेल्या तीन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे शेतीच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे पपई पिकाला नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा - नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस; खरिपाचा ‘अंकुर' बहरणार
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात बुधवारी सायंकाळ पासून जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.
हे ही वाचा - अमरावती शहर आणि जिल्ह्यात पुन्हा मान्सून सक्रिय; सर्वत्र मुसळधार पाऊस