नंदुरबार - नवापूर रस्त्यावर असलेल्या शिवन नदीत रिक्षा कोसळून झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. नदीवरील पुलाला कठडे नसल्याने आणि चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातातील चार जखमी प्रवाशांपैकी एका प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे.
हेही वाचा... VIDEO : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सरपंचाला बेदम मारहाण
जखमी प्रवाशांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवन नदीच्या पुलाला दोन्ही बाजूला कठडे नसल्यामुळे हा अपघात झाला आहे.
हेही वाचा... बुधवार ठरला अपघातवार; २ अपघातात तिघे ठार
नंदुरबार शहरानजीक असलेल्या शिवन नदीच्या पुलावरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रिक्षा नदीत कोसळली. अनेक दिवसांपासून शिवन नदीवरील हा पूल धोकादायक स्थितीत असून पुलाला संरक्षक कठडे नसल्याने, असे अनेक अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुलाला संरक्षक कठडे बांधावेत, यासाठी नागरिकांनी वारंवार मागणी केली. मात्र, या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल वाहनधारकांनी आणि नागरिकांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा.... 'आकाशने परश्यासारखी उडी मारली, तो माझ्यासाठी देवदूत'