ETV Bharat / state

Cruiser Accident Nandurbar: धक्कादायक! क्रूझर नाल्यात कोसळल्याने भाविकांवर काळाचा घाला; चार ठार - Accident News

क्रुझर नाल्यात कोसळल्याने भाविकांवर काळाने घात केला आहे. क्रूझर अपघातात 4 ठार 50 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात नंदूरबार जिल्ह्यातील भराडीपादर येथे झाला. भराडीपादर गावाच्या उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या खाली असलेल्या खोल नाल्यात कोसळल्याने अपघात घडला.

Cruiser Accident Nandurbar
क्रूझर अपघात
author img

By

Published : Mar 1, 2023, 6:02 PM IST

नंदुरबार: सातपुड्याच्या रांगेत वसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील सुरू असलेल्या यात्रा उत्सवात येणाऱ्या भाविकांच्या वाहनावर काळाने घाला घातला आहे. क्रुझर वाहनात सुमारे 55 पेक्षा अधिक भाविक बसवून येणाऱ्या क्रुझर वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा अधिक जखमी झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविल्याने सदरचा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तात्काळ अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले व पुढे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.

भाविक यात्रेसाठी येत होते: वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात खापर येथे ग्रामदैवत अंबिका माता यात्रोत्सव सुरु आहे. या यात्रा उत्सवात परिसरातील भाविक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. दुर्गम-अतिदुर्गम भागातील भाविकांसह यात्रेकरु या ठिकाणी येत आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील कुवा, मोगरा, ओढी, रतनपाडा तसेच कोठली आदी गावातील भाविक खापरकडे येत होते.

वाहन नाल्यात कोसळले: कटांसखाई येथील वाहन चालक वेस्ता दिवाल्या वसावे हा त्याच्या ताब्यातील वाहनात (क्र.जी.जे.१६ झेड ५२०१) भाविकांना घेवून खापरकडे येत होता. वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त सुमारे ५० हून अधिक प्रवासी बसविलेले होते. असे असतांना वाहन चालक वेस्ता वसावे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालविले. भराडीपादर गावाच्या उतारावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या खाली असलेल्या खोल नाल्यात कोसळल्याने अपघात घडला.

अपघातात बालकांसह तरुणाचा मृत्यू: भराडीपादर येथून क्रुझर वाहनाने येत असताना वाहन पलटी झाला. या अपघातात दिनेश हात्या वसावे (वय १०), विलास रमोश पाडवी (वय १३), विलास राज्या वसावे (वय १४, तिघे रा. कटासखाई ता.अक्कलकुवा) व दिनेश बिज्या वसावे वसावे (वय २०,रा.कोठली ता.अक्कलकुवा) यांचा मृत्यू झाला. त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर त्यांच्यावर अक्कल व ग्रामीण रुग्णालयातच सविच्छेदन करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

अक्कलकुवा पोलिसात गुन्ह्याची नोंद: अपघातानंतर वाहन चालक वेस्ता दिवाल्या वसावे हा घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत अमरसिंग बिज्या वसावे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात वाहन चालक वेस्ता दिवाल्या वसावे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७, ६६/१९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत करीत आहेत. दरम्यान, मयत दिनेश वसावे, विलास पाडवी, विलास वसावे हे तिन्ही बालके कटांसखाई या एकाच गावातील असल्याने गावासह परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातातील जखमींची नावे: क्रुझर वाहनात क्षमते पेक्षा अधिक बसविल्याने जखमीची संख्या अधिक झाली होती. या अपघातात बालकांसह महिला व पुरुष मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत. यात रंजिता सिपा पाडवी, सिपा काल्या पाडवी, शैलेश दमण्या पाडवी, अनसीबाई भिमसिंग वसावे, कालू दिवाल्या पाडवी, महेश नारसिंग पाडवी, निर्मला दमण्या पाडवी, पुर्वी दमण्या पाडवी, मुन्नी हाण्या पाडवी, निकिता पुण्या पाडवी, केजल लालसिंग वसावे, सुरेश नारसिंग वसावे, मसरा बामण्या पाडवी, अनिष्का हाला पाडवी, हात्या दिवाल्या पाडवी, रेवली जेठ्या वसावे, जेठ्या दिवाल्या पाडवी, सेवा रेहमा पाडवी,

पुन्या ओल्या पाडवी, सुरेश नरशी वसावे, शांतीबाई वाहऱ्या वसावे, सिपा खादऱ्या पाडवी, रेतेश डाला वसावे, विलास रमेश पाडवी, विकास राला वसावे, जेवली जेठ्या वसावे, रविंद्र, रेमा बाला पाडवी, केजल नारसिंग वसावे (सर्व रा.कटांसखाई ता.अक्कलकुवा), कविता मांगा वसावे, प्रदिप मांगा वसावे, मांगा जालमा वसावे, गणेश ओल्या वसावे, मुन्नी दाखल्या राऊत, संजय रायज्या वसावे, कविता वनसिंग वसावे, सुमा लालसिंग वसावे, कविता मांगा वसावे, किसन बावा पाडवी, दातक्या सफा राऊत, अमरसिंग विज्या वसावे, लालसिंग विज्या वसावे (सर्व रा.कुवा ता.अक्कलकुवा)

खोली रोशा वसावे, ओली राजा वसावे (दोन्ही रा.मोगरा ता.अक्कलकुवा) व दिनेश डाला वसावे (रा.ओढी ता.अक्कलकुवा), स्वाती मुनेश पाडवी (रा.रतनपाडा ता.अक्कलकुवा) असे सुमारे ४४ जण गंभीर जखमी झाले आहेत. सदरचा अपघात दि.२७ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, अपघात घडल्याचे समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे पोलिस प्रशासनही घटनास्थळी पोहचले. जखमींना मिळेल त्या वाहनाने व रुग्णवाहिकेने अक्कलकुवा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

हेही वाचा: Maratha Reservation News : मराठा समाज सरकारविरोधात पुन्हा आक्रमक; मंत्रालयावर काढला लाँग मार्च

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.