ETV Bharat / state

नंदुरबारमधील दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; चौघांकडून 20 दुचाक्या जप्त

author img

By

Published : Nov 27, 2019, 1:17 PM IST

मोटारसायकल चोरी करणारी टोळी नवापूर पोलीसांनी गजाआड केली असून ४ संशयितांसह पोलिसांनी 20 दुचाक्या ताब्यात घेतल्या आहेत.

navapur police
ताब्यात घेतलेल्या आरोपी, दुचाकींसह पोलिस पथक

नंदुरबार - मोटारसायकल चोरी करणारी टोळी नवापूर पोलीसांनी गजाआड केली असून ४ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

नवापूर तालुक्यासह परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. नवापूर पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी संशयित येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार संशयितांना मोटारसायकल विक्री करताना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यावेळी पोलीसांनी दोन पथक तयार करून बनावट ग्राहक बनून मोटारसायकल खरेदी करण्याच्या बहाण्याने संशयिताला चिंचपाडा येथे बोलाविले.

ठरल्याप्रमाणे संशयित वैभव दिलीप परदेशी (रा.खांडबारा, ता.नवापूर) हा दुचाकी विक्रीसाठी आला असता पथकाने त्याला ताब्यात घेतले. वैभव परदेशी यास या गाड्या कुठून आणल्या त्याचे साथीदार कोणकोण आहेत? याची माहिती विचारली. त्यानंतर त्याचे साथीदार जफर सलीम पठाण (रा.खांडबारा) याला तत्काळ खांडबारा येथून अटक करून वैभव परदेशी व जफर पठाण यांच्याकडून ८ दुचाकी जप्त केल्या. या दोघांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

वैभव व जफर या दोघांनी त्यांचे सहसाथीदार जवानसिंग नाईक (रा.खैरवे) व सुभाष किसन वळवी (रा.निझर, जि.तापी) हे दोघेही या प्रकरणात असल्याचे सांगितले. या दोघांनाही पोलीसांनी अटक करून त्यांच्याकडून 12 मोटारसायकली जप्त केल्या. चौघाही संशयित आरोपींकडून पोलिसांनी 20 मोटारसायकली हस्तगत करत 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या मोटारसायकल नंदुरबार जिल्हा व लगतच्या गुजरात राज्यातून चोरल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन, पोलीस शिवाई जयेश बाविस्कर, योगेश साळवे, योगेश तनपुरे, दिनेश बाविस्कर, आदिनाथ गोसावी, दादाभाई वाघ यांनी केली.

हेही वाचा - वाहन पासिंग, परवान्यासाठी ग्राहकांची लूट; ४ ते ५ तास रांगेत करावी लागते प्रतीक्षा

Intro:नवापुर - मोटारसायकल चोरी करणारी टोळी नवापुर पोलीसांनी गजाआड केली असुन चौघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून वीस मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत.
Body:नवापुर तालुक्यासह परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. नवापूर पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी संशयित येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संशयितांना मोटारसायकल विक्री करतांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यानंतर पोलीसांनी दोन पथक तयार करुन बनावट ग्राहक बनुन मोटारसायकल खरेदी करण्याच्या बहाण्याने संशयिताला चिंचपाडा येथे बोलाविले. ठरल्याप्रमाणे संशयित वैभव दिलीप परदेशी रा.खांडबारा, ता.नवापूर हा दुचाकी विक्रीसाठी आला असता पथकाने त्यास ताब्यात घेतले. वैभव परदेशी यास या गाड्या कुठून आणल्या त्याचे साथीदार कोणकोण आहेत? याची माहिती विचारली. त्यानंतर त्याचे साथीदार जफर सलीम पठाण (रा.खांडबारा) यास तात्काळ खांडबारा येथुन अटक करुन वैभव परदेशी व जफर पठाण यांच्याकडून आठ दुचाकी जप्त केल्या. या दोघांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. वैभव व जफर या दोघांनी त्यांचे सहसाथीदार जवानसिंग नाईक (रा.खैरवे) व सुभाष किसन वळवी (रा.निझर, जि.तापी) हे दोघेही या प्रकरणात असल्याचे सांगितले. या दोघांनाही पोलीसांनी अटक करुन त्यांच्याकडुन 12 मोटारसायकली पोलीसांनी जप्त केल्या. चौघाही संशयित आरोपीतांकडून पोलीसांनी 20 मोटारसायकली हस्तगत करत चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला. सदरच्या मोटारसायकली या नंदुरबार जिल्हा व लगतच्या गुजरात राज्यातुन चोरल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन, पो.कॉ. जयेश बाविस्कर, योगेश साळवे, योगेश तनपुरे, दिनेश बाविस्कर, आदिनाथ गोसावी, दादाभाई वाघ यांनी केली.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.