ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये माकडाचा धुमाकूळ; माकडाच्या हल्ल्यात वनरक्षक गंभीर जखमी - वनरक्षक गंभीर जखमी नंदुरबार news

स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली माकडाला पकडण्यासाठी डुबकेश्‍वर महादेव मंदिर परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. परंतु दोन दिवसांपासून माकडाला पकडण्यात वनविभागाला यश येत नव्हते. अखेर माकडाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

नंदुरबारमध्ये माकडाचा धुमाकूळ; माकडाच्या हल्ल्यात वनरक्षक गंभीर जखमी
author img

By

Published : Nov 24, 2019, 12:02 PM IST

नंदुरबार - शहरातील कॉलनी परिसरात धुमाकुळ घालणार्‍या माकडाला अखेर वनविभागाने पिंजर्‍यात जेरबंद करुन त्याला जंगलात सोडण्यात आले आहे. दरम्यान, जंगलात या माकडाला सोडुन परतत असताना वनरक्षकांवर या माकडाने हल्ला केल्याने वनरक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

नंदुरबारमध्ये माकडाचा धुमाकूळ; माकडाच्या हल्ल्यात वनरक्षक गंभीर जखमी

हेही वाचा - राष्ट्रवादीचे आमदार पवईतील रेनिन्सन हॉटेलमध्ये मुक्कामी

गेल्या चार ते पाच दिवसांपासून जगतापवाडीच्या पुढे असलेल्या डुबकेश्‍वर महादेव मंदिर परिसरात या माकडाने धुमाकुळ घातला होता. या माकडामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली माकडाला पकडण्यासाठी डुबकेश्‍वर महादेव मंदिर परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. परंतु दोन दिवसांपासून माकडाला पकडण्यात वनविभागाला यश येत नव्हते. अखेर माकडाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

हेही वाचा - राजस्थानामध्ये भीषण अपघातात लातूरच्या १३ जणांचा मृत्यू, ग्रामस्थांनी घडवले माणुसकीचे दर्शन

माकड डुबकेश्‍वर महादेव मंदिर परिसरात धुमाकुळ घालत होता. माकडाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले होते. माकडाला जेरबंद केल्यानंतर शनिवारी जंगलात सोडण्यात आले. दरम्यान, माकडाला सोडल्यानंतर वनरक्षक अरविंद निकम आपल्या सहकार्‍यांसमवेत परतत असताना या माकडाने त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केले. माकडाच्या हल्ल्यात वनरक्षक निकम यांचे हाताचे बोट फ्रॅक्चर झाले असून पायालाही गंभीर जखम झाली आहे. त्यांच्यावर नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहे. सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनपाल संजय पाटील, भाबड, वनरक्षक अरविंद निकम, भानुदास वाघ, माजी सैनिक शिरसाठ यांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी 40 आमदारांची उपस्थिती

वनरक्षक अरविंद निकम हे माकडाच्या हल्ल्यात जखमी झाल्याने सरकारकडुन त्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. डुबकेश्‍वर महादेव मंदिर परिसरातुन पकडण्यात आलेल्या माकडाचे वय दीड ते दोन वर्ष असून त्याचे वजन 30 ते 35 किलो होते. त्यांची उंची सुमारे 3 फुट असून नर जातीचे हे माकड होते.

Intro:नंदुरबार - नंदुरबार शहरात कॉलनी परिसरात धुमाकुळ घालणार्‍या माकडाला अखेर वनविभागाने पिंजर्‍यात जेरबंद करुन जंगलात सोडण्यात आले आहे. दरम्यान जंगलात माकडाला सोडुन परतत असतांना वनरक्षकावर या माकडाने हल्ला केल्याने वनरक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. Body:गेल्या चार ते पाच दिवसांपासून जगतापवाडीच्या पुढे असलेल्या डुबकेश्‍वर महादेव मंदिर परिसरात माकडाने धुमाकुळ घातला होता. या माकडामुळे लहान बालकांसह नागरिकही धास्तावले होते. अनेक रहिवाश्यांनी माकडाबद्दल वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली माकडाला पकडण्यासाठी डुबकेश्‍वर महादेव मंदिर परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. परंतु दोन दिवसांपासुन माकडाला पकडण्यात वनविभागाला यश येत नव्हते. अखेर माकडाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. सदर माकड डुबकेश्‍वर महादेव मंदिर परिसरात धुमाकुळ घालत होता. माकडाच्या दहशतीमुळे बालकांसह नागरिकही भयभीत झाले होते. माकडाला जेरबंद केल्यानंतर काल जंगलात त्याला सोडण्यात आले. दरम्यान माकडाला सोडल्यानंतर वनरक्षक अरविंद निकम आपल्या सहकार्‍यांसमवेत परतत असतांना या माकडाने त्यांच्यावर हल्ला चढवत गंभीर जखमी केले. माकडाच्या हल्ल्यात वनरक्षक अरविंद निकम यांचा बोट फ्रॅक्चर झाला असून पायाला टाके आले आहेत. त्यांच्यावर नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहे. सदर कारवाई सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनपाल संजय पाटील, भाबड, वनरक्षक अरविंद निकम, भानुदास वाघ, माजी सैनिक शिरसाठ यांनी केली आहे. दरम्यान, वनरक्षक अरविंद निकम हे माकडाच्या हल्ल्यात जखमी झाल्याने शासनाकडुन त्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.Conclusion:डुबकेश्‍वर महादेव मंदिर परिसरातुन पकडण्यात आलेल्या माकडाचे वय दिड ते दोन वर्ष असून त्याचे वजन 30 ते 35 किलो होते. त्यांची उंची सुमारे 3 फुट असून नर जातीचे हे माकड होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.