नंदुरबार - भरधाव वेगातील वाहनाच्या धडकेत ओमनीसह भरधाव वाहन नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन उलटल्याची घटना नवापूर तालुक्यातील सावरट गावाजवळ घडली. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. नंतर चिंचपाडा पोलिसांसह नागरिकांनी मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. तसेच क्रेनच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यालगतच्या शेतातून बाहेर काढली.
नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावाकडून ओमनी गाडी (जीजे 26 एम 2237) नवापूरकडे जात होती. यावेळी महामार्गावर सावरट गावाजवळ भरधाव वेगातील सीएमएस कंपनीच्या वाहनाने (एमएच 12 एसएफ 5802) ओमनी गाडीला मागून धडक दिली. यामुळे दोन्ही वाहनांवरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहने रस्त्यालगतच्या शेतात उलटली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, चिंचपाडा येथील शायद शकील खाटीक व राजेश वसावे हे गंभीर जखमी झाले आहेत.
तसेच सीएमएस वाहनातील तीन जण जखमी झाले आहेत. अपघात घडताच नागरिकांनी धाव घेतली. तसेच माहिती मिळताच चिंचपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या चालकांसह प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी नवापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातातील दोन्ही वाहने चिंचपाडा पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बाहेर काढले.