नंदुरबार - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तालुका क्रीडा मैदानात शहर पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्ह्यातील वाहने उभी करण्यात आली होती. दुपारी अचानक वाहनांना आग लागली यात दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले तर एक ट्रॅक्टर जळाले आहे. वेळीच शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे ही आग आटोक्यात आली व कुठलीही जीवित हानी झाली नाही.
अचानक आग लागल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ
नंदुरबार शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या गाड्यांना अचानक आग लागल्याने धावपळ उडाली. शहर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या तालुक्यात क्रीडा संकुलाच्या मैदानावर ही वाहने लावण्यात आली आहेत. त्यातील काही वाहनांतून धुर येत असल्याचे काही पोलीस कर्मचाऱ्यांना आढळले. त्यानंतर याठिकाणी आग रौद्ररूप धारण करत आले असल्याचे लक्षात आले. यात दोन चारचाकी वाहने जळाल्या, तर बाजूला उभ्या असलेले एक ट्रक आणि ट्रॅक्टरलाही काही प्रमाणात या आगीची झळ बसली आहे.
नंदुरबार नगरपालिकेचे अग्निशामक बंब पाचारण
पोलिसांनी घटनास्थळी अग्निशामक दलाच्या बंबाला पाचरण केल्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अतिशय मोकळ्या मैदानात अडगळीच्या ठिकाणी असलेल्या या गाड्यांना आग कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी सुदैवाने या कुठलीही जीवित हानी झाली नाही.
हेही वाचा - पालकमंत्री के. सी. पाडवींच्या हस्ते नंदुरबारमध्ये रुग्णवाहिकांचे लोकार्पण