नंदुरबार - नवापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विजय इलेक्ट्रिक दुकानाला अचानक आग लागल्यामुळे ( Nandurbar Fire ) लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही यासह विविध इलेक्ट्रॉनिक ( Vijay Electric Nandurbar ) साहित्य जळून खाक झाले आहेत. आग विझविण्यासाठी नवापूर, नंदुरबार, सोनगड येथून अग्निशामक बंब यांना पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मात्र या आगीत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
आगीत लाखो रुपयांचे नुकसान -
नवापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समोरील विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकानात पहाटे पाचच्या सुमारास आग ( Fire on Electric Shop Nandurbar ) लागली आहे. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आगीचे धुर वरपर्यंत जात आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचे लोढे जास्त असल्याने आग पसरत गेली व पूर्ण विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाले. तसेच गोडाऊन मधील साहित्य देखील जळून खाक झाली आहे.
या आगीमध्ये 70 ते 80 लाखाचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहेत. दुकान आणि गोडाऊन एकाच ठिकाणी असल्याने मोठे नुकसान झाले आहे. 30-40 फ्रिज, 10 एसी, 30 एलईडी टि.व्ही, 250 फॅन, 10 वॉशिंग मशीन, 40 साधी टिव्ही, 50 आर्यन यासह इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहे. नवापूर नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाच्या तीन गाडी, सोनगड नगर परिषद अग्निशामक, नंदुरबार नगर परिषद अग्निशामक दल दाखल झाले.