ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये वृद्धाने भाजपच्या प्रचारासाठी निवडला 'हा' मार्ग, गुन्हा दाखल - election period

नंदुरबारमधील नवनाथनगर वसाहतीतील एकनाथ मोतीराम चौधरी (वय ६५) त्यांच्या कुत्र्यासोबत अंधारे रुग्णालय परिसरात फिरत होते. त्यांच्या कुत्र्याच्या शरीरावर भाजपचे स्टिकर्स आणि पक्षाचे कमळ चिन्ह स्पष्टपणे दिसत होते.

नंदुरबारमध्ये वृद्धाने भाजपच्या प्रचारासाठी निवडला 'हा' मार्ग
author img

By

Published : May 2, 2019, 7:39 PM IST

नंदुरबार - मतदानाच्या दिवशी कुत्र्यासोबत मोदींचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कारवाया काही नवीन नाहीत. कुत्र्याच्या शरीरावर भाजपचे स्टिकर्स असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी कुत्र्याच्या मालकालादेखील ताब्यात घेतले आहे.

२८ एप्रिलला मतदानाच्या दिवशी नंदुरबारमधील नवनाथनगर वसाहतीतील एकनाथ मोतीराम चौधरी (वय ६५) त्यांच्या कुत्र्यासोबत अंधारे रुग्णालय परिसरात फिरत होते. त्यांच्या कुत्र्याच्या शरीरावर भाजपचे स्टिकर्स आणि पक्षाचे कमळ चिन्ह स्पष्टपणे दिसत होते. 'मोदी लाओ, देश बचाओ' असे घोषवाक्य कुत्र्याच्या शरीरावर असलेल्या स्टिकरवर लिहिले होते. त्यानंतर चौधरी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १७१ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदान सुरू असतानाही प्रचार केल्याप्रकरणी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. चौधरी यांची मानसिक स्थिती खराब असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Intro:नंदुरबार, मतदानाच्या दिवशी कुत्र्यासबोत मोदींचा प्रचार करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखलBody:नंदुरबार: लोकसभा निवडणुकीची धामधूम आणि या काळात पोलिसांकडून, निवडणूक आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कारवाया काही नवीन नाहीत. कुत्र्याच्या शरीरावर भाजपाचे स्टिकर्स असल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी कुत्र्याच्या मालकालादेखील ताब्यात घेतलं.Conclusion:28 एप्रिल सोमवारी मतदानाच्या दिवशी नंदुरबारमधल्या नवनाथनगर वसाहतीतील एकनाथ मोतीराम चौधरी (वय 65) त्यांच्या कुत्र्यासोबत अंधारे रुग्णालय परिसरात फिरत होते. त्यांच्या कुत्र्याच्या शरीरावर भाजपाचे स्टिकर्स आणि पक्षाचं कमळ चिन्ह स्पष्टपणे दिसत होतं. 'मोदी लाओ, देश बचाओ' असं घोषवाक्य कुत्र्याच्या शरीरावर असलेल्या स्टिकरवर होतं, त्यानंतर शहरात फिरत असलेल्या चौधरी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 171 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मतदान सुरू असतानाही प्रचार केल्याप्रकरणी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. चौधरी यांची मानसिक स्थिती खराब असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.