नंदुरबार - सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास किंवा मास्क न वापरल्यास दोन हजार रुपयांपर्यत दंड वसूल करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी आदेश दिला आहे.
देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुध्दा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना जारी केल्या आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पाचशे रुपये दंड तसेच दुसऱ्यांदा थुंकतांना आढळल्यास दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापल्यास एक हजार रुपये दंड आणि तिच व्यक्ती दुसर्यांदा आढळल्यास दोन हजार रुपये दंड वसुल करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास पाचशे रुपये दंड आकरण्यात येणार असल्याची माहिती प्रशसानाकडून देण्यात आली आहे.