नंदुरबार- अक्कलकुवा तालुक्यातील तीनखुण्या येथे एका घरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून छापा टाकण्यात आला. यात दोन लाख 57 हजार 280 किंमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नंदुरबार पथकाने गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागातील अक्कलकुवा तालुक्यातील तीनखुण्या येथे राजेंद्र मधुकर वसावे याच्या घरावर भरदिवसा छापा टाकला. यात दोन लाख 57 हजार 280 इतक्या किंमतीचा विविध ब्रँडचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. आरोपी राजेंद्र वसावे फरार असून त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.