ETV Bharat / state

नंदूरबार लोकसभा : अपक्ष उमेदवार डॉ. सुहास नटावदकरांच्या उमेदवारीने चुरस, भाजप व काँग्रेस उमेदवारांची उडवली झोप

डॉ. नटावदकर हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख आहे. जिल्हाध्यक्ष पद सांभाळत २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून खासदारकी लढवली मात्र ते विजय गाठू शकले नाही.

author img

By

Published : Apr 26, 2019, 8:03 AM IST

Updated : Apr 26, 2019, 12:51 PM IST

नंदूरबार लोकसभा

नंदुरबार - नंदुरबार लोकसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार डॉ. सुहास नटावदकर यांच्या उमेदवारीमुळे भाजप आणि काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. डॉ. सुहास नटावदकर यांच्या उमेदवारीमुळे भाजप उमेदवारा सोबतच काँग्रेस उमेदवारालाही मतविभाजनाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या लोकसभा क्षेत्रात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

नंदूरबार लोकसभा

डॉ. नटावदकर यांनी आपल्या निवडणूक चिन्ह बॅटने चौकार, षटकार ठोकत भाजप व काँग्रेस उमेदवारांची झोप उडवली आहे. नंदुरबार जिल्ह्यात ज्यांनी भाजप रोवली त्यांनाच आज अपक्ष उमेदवारी लढवण्याची वेळ आली आहे. डॉ. नटावदकर हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख आहे. जिल्हाध्यक्ष पद सांभाळत २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून खासदारकी लढवली मात्र ते विजय गाठू शकले नाही २०१४ च्या निवडणुकीत चांगले दिवस आल्यावर पक्षाने राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. हिना गवितांना उमेदवारी दिली, भारतीय जनता पार्टीचा खासदार जिल्ह्याला मिळाला खरा परंतु गेल्या चार वर्षांत जुने व नवीन कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ झाला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुहास नटावदकर यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली मात्र पक्षाने ती दिली नाही त्यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढल्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे.
डॉ. सुहास नटावदकर यांना २००४ मध्ये २ लाख ४४ हजार २९० तर २००९ मध्ये १ लाख ९५ हजार ९८७ मते मिळाली होती. त्यावरून त्यांचा जनाधार लक्षात येतो. नंदुरबार लोकसभा क्षेत्रात नटावदकर कुटुंब १९४७ सालापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे अनेक शाळा, महाविद्यालय सुरू करून आदिवासी भागात शिक्षण पोहोचवण्याचे काम ते करत आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते डॉ. सुहास नटावदकर यांच्या उमेदवारीमुळे भाजप उमेदवारा सबोतच काँग्रेस उमेदवारालाही मतविभाजनाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, डॉ. सुहास नटावदकर यांची बॅट किती धावा काढते हे २३ मे लाच कळेल.

Intro:Note :- उमेदवार डॉ. सुहास नटावदकर यांचा 121 एडिट करून पाठवला आहे,

हेडींग :- अपक्ष उमेदवार डॉ. सुहास नटावदकर यांनी आपल्या निवडणूक चिन्ह बॅटने चौकार,षटकार ठोकत भाजप व कांग्रेस उमेदवारांची झोप उडवली आहे...
Body:नंदुरबार जिल्ह्यात ज्यांनी भाजपा रोवली त्यांनाच आज अपक्ष उमेदवारी लढवण्याची वेळ आली
डॉ. सुहास नटावदकर हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख आहे जिल्हा अध्यक्ष पद सांभाळत सामाजिक कार्य करत 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून खासदारकी लढवली मात्र ते विजय गाठू शकले नाही 2014 च्या निवडणुकीत चांगले दिवस आल्यावर पक्षाने राष्ट्रवादीतुन आलेल्या डॉ. हिना गवितांना उमेदवारी दिली, भारतीय जनता पार्टीचा खासदार जिल्ह्याला मिळाला खरा परंतु गेल्या चार वर्षांत जुने व नवीन कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ झाला नाही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुहास नटावदकर यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली मात्र पक्षाने ती दिली नाही त्यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढल्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यांना बॅट हे चिन्ह मिळालं आहे.

डॉ. सुहास नटावदकर यांना मिळालेले मताधिक्य

2004 मताधिक्य 244290

2009 मताधिक्य 195987

नंदुरबार लोकसभा क्षेत्रात नटावदकर कुटुंब 1947 सालापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे अनेक शाळा, महाविद्यालय सुरू करून आदिवासी भागात शिक्षण पोहचवण्याचं काम करत आहे,
Conclusion:राजकिय विश्लेषकांच्या मते डॉ. सुहास नटावदकर यांच्या उमेदवारी मुळे भाजप उमेदवारा सबोतच कांग्रेस उमेदवारालाही मतविभाजनाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे,
डॉ. सुहास नटावदकर यांची बॅट किती धावा काढते हे 29 एप्रिलला मतदान झाल्यानंतर 23 मे पर्यंत वाट पाहावी लागेल.
Last Updated : Apr 26, 2019, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.