ETV Bharat / state

धडगाव तालुक्यातील महिला रुग्‍णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण; किरकोळ कामातील दिंरगाईने उद्घाटनाचा मुहुर्त लांबणीवर

धडगाव तालुक्यातील ५० खाटांचे महिला रूग्णालयाचे काम दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाले आहे. परंतु, केवळ वीज पुरवठा आणि पुरवठ्याची जोडणी नवीन इमारतीला झालेली नाही. त्यामुळे रुग्णालय अजूनही सुरू होऊ शकले नाही.

धडगाव तालुक्यातील ५० खाटांचे महिला रूग्णालय सुरू होण्याच्या प्रतीक्षेत
author img

By

Published : Jun 3, 2019, 12:25 PM IST

नंदुरबार - ग्रामीण भागातील नागरिकांना सोयी सुविधा पासून कसे वंचित ठेवण्यात येते याचे जिवंत उदाहरण धडगाव तालुक्यात दिसून आले आहे. याठिकाणी ५० खाटांचे महिला रूग्णालयाचे काम दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाले आहे. परंतु, केवळ वीज पुरवठा आणि पाणीपुरवठ्याची जोडणी नवीन इमारतीला झालेली नाही. त्यामुळे रुग्णालय अजूनही सुरू होऊ शकले नाही.

धडगाव तालुक्यातील ५० खाटांचे महिला रूग्णालय सुरू होण्याच्या प्रतीक्षेत

सातपुड्याच्या धडगाव तालुक्यात माता व बालमृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहे. परंतु तेथे खाटांची संख्या आणि डॉक्टरांची संख्याही कमी आहे. त्यामुळे नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयाकडून योग्य ती सेवा मिळत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने याठिकाणी ५० खाटांचे महिला रुग्‍णालय बांधण्यास २०१२ मध्ये मंजुरी दिली. त्यानुसार नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. परंतु, मागील ५ वर्ष या रुग्णालयाचे काम संथगतीने सुरू राहिले. तर गेल्या दीड वर्षापासून या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, आता केवळ वीज पुरवठा आणि पाणीपुरवठयाची जोडणी नवीन इमारतीला झालेली नाही. त्यामुळे रुग्णालय अजूनही सुरू होऊ शकले नाही.

यासंदर्भात याठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारले असता, केवळ वीज पुरवठा आणि पाणीपुरवठ्याची जोडणी झालेली नाही. त्यामुळे नवीन रुग्णालय सुरू करता आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाशी आम्ही संपर्क साधला आहे. १५ ते २० दिवसात हे काम पूर्ण करून नवीन रुग्णालय सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

महिला रूग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून किरकोळ कामासाठी रुग्णालय सुरू करण्याचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून रुग्णालय सुरू करावे आणि या भागातील रुग्णांना सेवा द्यावी, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Intro:ग्रामीण भागातील नागरिकांना सोयी सुविधा पासून कसं वंचित ठेवण्यात येत याचं जिवंत उदाहरण म्हणजे धडगाव तालुक्यातील पन्नास खाटांचे महिला रुग्‍णालय, या महिला रूग्णालयाला 2012 मध्ये मंजुरी मिळाली होती, नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली परंतु गेली पाच वर्ष या रुग्णालयाचे काम संथगतीने सुरू राहिलं गेल्या दीड वर्षापासून या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे, केवळ वीज पुरवठा आणि पाणीपुरवठयाची जोडणी नवीन इमारतीला झालेली नाही, त्यामुळे रुग्णालय अजूनही सुरू होऊ शकलं नाही. धडगाव तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आहे परंतु त्याठिकाणी खाटांची संख्या आणि डॉक्टरांची संख्याही कमी असल्याने नागरिकांना उपजिल्हा रुग्णालया कडून योग्य ती सेवा मिळत नाही.Body:सातपुड्याच्या धडगाव तालुक्यात माता व बालमृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने या ठिकाणी पन्नास खाटांचे महिला रुग्‍णालय मंजूर करून काम पूर्ण केले आहे. परंतु किरकोळ कामासाठी नवीन इमारतीत रुग्णालय सुरू करण्याचा वेळ वाया जातो आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारले असता केवळ वीज पुरवठा आणि पाणीपुरवठा ची जोडणी झालेली नाही त्यामुळे नवीन रुग्णालय सुरू करता आलेले नाही सार्वजनिक बांधकाम विभागाची आम्ही संपर्क साधला असून पंधरा ते वीस दिवसात हे काम पूर्ण करून नवीन रुग्णालय सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.Conclusion:धडगाव तालुक्यातील पन्नास खाटांचे महिला रुग्णालयाच्या कामाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रुग्णालय सुरू करून या भागातील रुग्णांना सेवा द्यावी हीच अपेक्षा.

Byte डॉक्टर संतोष परमार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.