नंदुरबार - हातभट्टीची दारू बनवण्याकरता घेऊन जाणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात मोहाफुलांची झाडे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मोहा फुलांची दारू बनविण्याचे प्रमाणही मोठे आहे. आदिवासी पाड्यात मोहा फुलांची दारू बनवून त्याची विक्री केली जाते. हातभट्टी दारू बनविण्यावर बंदी असूनसुद्धा या भागात हातभट्टीची दारू बनवली जाते.
शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर परिसरात राहुल गौतमचंद जैन याला अटक करत त्याच्याकडून मोहाफुल, नवसागर, काळा गुळ हातभट्टीसाठी लागणारे साहित्य मिळून एकूण १० लाख २२ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.