नंदुरबार - जिल्ह्यात अति पावसामुळे पिकांची पूर्णत: नासाडी झाली आहे. त्यातच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कापसाच्या पिकावर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या ५ वर्षांपासून शेतकरी दुष्काळाचा सामना करत होते. अल्प पावसावर येणाऱ्या पिकांवर शेतकरी आपली गुजराण करत होते, त्यातच बोंडअळी यासारख्या अनेक समस्यांनी शेतकऱ्यांना बेजार केले होते. तर, यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधी उत्पन्न खर्च आणि उत्पादन यांचा ताळमेळ बसत नव्हता त्यात परतीच्या पावसामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाल्याचे समोर आले आहे. कापसाच्या पिकावर लाल्या रोगाचे लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामुळे कापसाची पाने लाल होऊन गळू लागली असून त्याचा परिणाम कापसाच्या उत्पन्नावर होणार आहे. एकूणच नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार असल्याचे चित्र समोर आले आहे.
हेही वाचा - नंदुरबार शहरातील एटीएम बंद, नागरिकांचे हाल
हेही वाचा - नंदुरबारमधील 12 लाख प्राधान्य योजनेतील कुटुंबांना मिळणार धान्य वितरण आणि गॅस जोडणी