ETV Bharat / state

कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विक्रीला सुरुवात; शासनाच्या नियमात शिथिलता

author img

By

Published : Dec 8, 2019, 10:21 AM IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत सीसीआयने कापूस खरेदीला सुरवात केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसामुळे कापसात आद्रतेचे प्रमाण वाढल होते. त्यामुळे कापूस खरेदी बंद करण्यात आली होती.

nandurbar
कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार

नंदुरबार - कृषी उत्पन्न बाजार समितीत सीसीआयने कापूस खरेदीला सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसामुळे कापसात आद्रतेचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. त्यानंतर खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा कापूस कमी भावात खरेदी करून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती. याबाबत तक्रारी आल्यानंतर सीसीआयने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर खरेदी सुरू केली आहे.

माहिती देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन किशोर पाटील

खेरेदी केंद्रावर कापसाला सरकारी हमीभाव प्रमाणे दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केल जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस ओला झाला होता. बाजार समितीत सदर कापूस हा १८ ते २० टक्के ओला असल्यामुळे भारतीय कपास निगम यांच्या १२ टक्केपर्यंत ओलावा या मापदंडात बसत नव्हता. त्यामुळे सीसीआयच्या अधिकार्‍यांनी कापसाची खरेदी शासनाच्या हमी भावानुसार केली नाही. बाजार समितीच्या परवानाधारक खरेदीदारांनी सदर कापसास ४ ते ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने शेतकर्‍यांना भाव देवू केले. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आल्याने शेतकरी आपला कापूस विक्री न करता परत घेवून गेला होता.

मात्र, आता शासनाने मापदंड शिथिल केल्याने दररोज या कापूस खरेदी केंद्रावर ५०० क्विंटल कापसाची आवक होत असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजार समितीत विक्रीसाठी आणावा व हमीभावाचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर, बाजार समितीत कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्र सोबत आणावे, असे आवाहन देखील बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा- नंदुरबार: शहादा घरफोडीतील अल्पवयीन मुलगा ताब्यात; एलईडीसह 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Intro:नंदुरबार - कृषी उत्पन्न बाजार समितीत सीसीआय च्या कापूस खरेदीला सुरवात झाली असून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. आवकाळी पावसामुळे कापसात आद्रतेचे प्रमाण वाढल्याने कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या खेडा खरेदी सुरु करून खाजगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच कापूस कमी भावात खरेदी करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती. या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर सीसीआय ने नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर खरेदी सुरु केली आहे. या केंद्रावर online पद्धतीने कापसातील ओलावा कमी झाल्याने आता कापूस खरेदी सुरु केली आहे. कापसाला सरकारी हमी भाव प्रमाणे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल आहे.Body:अवकाळी पावसामुळे शेतातील कापुस ओला झाल्यामुळे बाजार समितीत कापुस विक्रीसाठी आला होता. मात्र सदर कापुस हा 18 ते 20 टक्के ओलावा असल्यामुळे भारतीय कपास निगम यांच्या 12 टक्केपर्यंत ओलावा या मापदंडात हा कापुस न बसल्यामुळे सीसीआयच्या अधिकार्‍यांनी एकही वाहन शासनाच्या हमी भावाने खरेदी केले नव्हता. बाजार समितीच्या परवानाधारक खरेदीदारांना सदरच्या कापसास 4000 ते 4200 या दरम्यान प्रतिक्विंटल शेतकर्‍यांना भाव देवु केल्याने शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होवुन लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आल्याने शेतकरी आपला कापुस विक्री न करता परत घेवुन गेला. सदरच्या परिस्थितीत वातावरणात आद्रता असल्यामुळे शेतातील कापुस काढणीनंतर नैसर्गिकरित्या 18 ते 20 टक्के दरम्यान ओलावा असल्यामुळे भारतीय कपास निगम ही केंद्रशासनाची किमान आधारभुत किंमतीने खरेदी करणारी नंदुरबार जिल्ह्यात एकमेव संस्था आहे.
मात्र आता शासनाने मापदंडात शीतलता केली असल्यामुळे दररोज या कापूस खरेदी केंद्रावर ५०० क्विंटल कापसाची आवक होत असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. तरी शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजार समितीत विक्रीसाठी आणावा व हमीभावाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. बाजार समितीत कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्र सोबत आणावे अस आवाहन देखील करण्यात आले आहे.

Byte -किशोर पाटील
चेअरमन - कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबारConclusion:Byte -किशोर पाटील
चेअरमन - कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.