ETV Bharat / state

आदिवासी विकास महामंडळाच्या योजनेत १३ कोटींचा अपहार; चौघांविरुध्द गुन्हा दाखल

author img

By

Published : Jan 24, 2020, 5:01 PM IST

Updated : Jan 24, 2020, 5:44 PM IST

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने लाभार्थ्यांसाठी तेलपंप आणि घरगुती गॅस वाटप योजना राबवण्यात आली होती. या तेलपंप वाटप योजनेत १२ कोटी १० लाखांचा तसेच घरगुती गॅस वाटप योजनेत ८४ लाखांचा असा एकूण १३ कोटींचा अपहार करुन शासनाची फसवणूक करण्यात आली आहे.

Tribal Development Corporation scheme
आदिवासी विकास महामंडळ

नंदुरबार - आदिवासी विकास महामंडळाच्या तेलपंप वाटप योजनेसह घरगुती गॅस युनिट वाटपात १३ कोटींचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौघांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदिवासी विकास महामंडळ

हेही वाचा - टाटा-मिस्त्री प्रकरण; एनसीएलएटीच्या त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने लाभार्थ्यांसाठी तेलपंप आणि घरगुती गॅस वाटप योजना राबवण्यात आली होती. या तेलपंप वाटप योजनेत १२ कोटी १० लाखांचा तसेच घरगुती गॅस वाटप योजनेत ८४ लाखांचा असा एकूण १३ कोटींचा अपहार करुन शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. सोपान संबारे यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन विजतंत्री गोकुळ रतन बागुल (रा.शेवगे, ता. साक्री ), तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक संभाजी राघो कोळसे, आकाशदिप विद्युत कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष अरुण शेवलाल कोकणी, उपाध्यक्ष गिरीष उदेसिंग परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवटे करत आहेत.

हेही वाचा - मुंबईत आढळले कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण; कस्तुरबा रुग्णालयात दाखल

२००४ ते २००९ या कालावधीत आदिवासी विकास विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या होत्या. या योजनांचा लाभ अनेक वाड्या-पाड्यांना झाला असला तरी यात आर्थिक गैरव्यवहारही मोठ्या प्रमाणात झाला. अनेक योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना न देता संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने यात अपहार केला.

Intro:नंदुरबार - आदिवासी विकास महामंडळाच्या तेलपंप वाटप योजनेत तसेच घरगुती गॅस युनिट वाटप योजनेत 13 कोटीचा अपहार केल्याप्रकरणी चौघांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने लाभार्थ्यांसाठी तेलपंप व घरगुती गॅस वाटप योजना होती. या तेलपंप वाटप योजनेत 12 कोटी 10 लाखांचा तसेच घरगुती गॅस वाटप योजनेत 84 लाखांचा असा एकुण 13 कोटींचा अपहार करुन शासनाची फसवणुक केली. म्हणुन सोपान संबारे यांच्या फिर्यादीवरुन तत्कालीन विजतंत्री गोकुळ रतन बागुल (रा.शेवगे ता.साक्री जि.नंदुरबार), तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक संभाजी राघो कोळसे, आकाशदिप विद्युत कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष अरुण शेवलाल कोकणी, उपाध्यक्ष गिरीष उदेसिंग परदेशी यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420, 406, 409, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवटे करित आहेत.
Conclusion:सन २००४ ते २००९ या कालावधीत आदिवासी विकास विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या होत्या. या योजनांचा लाभ वाड्यापाड्यात पोहचला होता. परंतू भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणावर झाला होता. अनेक योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना न देता संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमत करुन अपहार केला होता. याप्रकरणी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Jan 24, 2020, 5:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.